करकंब : दयानंद शिक्षण संस्था नवी दिल्ली अध्यक्ष पद्मश्री पुनम सुरी यांच्या मार्गदर्शनाखाली संपूर्ण भारत व भारताबाहेर असणाऱ्या सुमारे ३हजार शाळा कॉलेजमधून १२ फेब्रुवारी रोजी महर्षी दयानंद सरस्वती यांच्या २९२व्या जयंती निमित्त विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते.त्या अनुषंगाने रामभाऊ जोशी हायस्कूल व डी.ए.व्ही महात्मा आनंद स्वामी सरस्वती ज्यु.काॅलेज करकंब येथे दयानंद शिक्षण संस्था सोलापूर यांचे स्थानिय सचिव महेश चौप्रा व प्रशासक डॉ.विजयकुमार उबाळे यांच्या मार्गदर्शनाखाली “महर्षी दयानंद सरस्वती जन्मोत्सव” व २९२व्या जयंती निमित्त भव्य जन्मोत्सव स्मरणोत्सव कार्यक्रमांतर्गत जगाच्या कल्याणासाठी “महर्षी दयानंद प्रशंसन यज्ञ” व “होम हवन” करण्यात आले.
यावेळी आचार्य वेद सुमन भोसले यांनी महर्षी दयानंद यांचे शैक्षणिक,सामाजिक व स्वातंत्र्य लढ्यातील योगदानाबद्दल सविस्तर माहिती दिली.या यज्ञासाठी श्री व सौ.हेमंत कदम,श्री व सौ.महादेव पुजारी,श्री व सौ.रमेश कविटकर,श्री व सौ नामदेव सलगर यांनी सहभाग घेतला.यावेळी ऍडव्होकेट एस.आर.जोशी,लक्ष्मण वंजारी,मारुती व्यवहारे,विद्यार्थी पालकवर्ग मोठ्या प्रमाणात उपस्थितीत होते.
२९२ व्या जयंतीचे औचित्य साधून गत वर्षभर विद्यार्थ्यांसाठी शैक्षणिक व सामाजिक उपक्रम संस्थेच्या वतीने मोठ्या प्रमाणात राबवण्यात आले.विविध विषयात प्रावीण्य मिळविलेल्या विद्यार्थ्यांना पारितोषिक देण्यात आली.होम हवन झाल्यानंतर विद्यार्थी व उपस्थित ग्रामस्थांना प्रसादाचे वाटप करण्यात आले.





















