सोलापूर – जुळे सोलापूर श्रीशैल नगर मधील श्री मलिकार्जून मंदिरात महाशिवरात्र निमित्त भक्तिमय वातावरणात महोत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. पहाटे रुद्राभिषेक आरतीने कार्यक्रमाची सुरुवात झाली. दिवसभर महादेवाच्या पिंडीवर दुग्धाभिषेक, जलाभिषेक तसेच बिल्वपत्र अर्पण करून हजारो भाविकांनी दर्शन घेतले.
सायंकाळी शिवभजन हरी भजन कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. मंदिर परिसर आकर्षक फुलांची सजावट व विद्युत रोषणाईने उजळून निघाला होता. रात्री बारा वाजता महाआरती संपन्न झाली. यावेळी “हर हर महादेव” च्या जयघोषाने परिसर दुमदुमून गेला. श्री
मलिकार्जून भक्तमंडळा च्या सहकार्याने महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते. भक्तमंडळाच्या वतीने भाविकांचे स्वागत व उत्कृष्ट व्यवस्थापन करण्यात आले. कार्यक्रम यशस्वी पार पाडण्यासाठी सर्व भक्तमंडळातील , स्वयंसेवक व भक्तगण यांनी विशेष परिश्रम घेतले.



























