तिल्हेहाळ – येथील जागृत महादेव मंदिरात महाशिवरात्री उत्सव विविध धार्मिक कार्यक्रमांनी उत्साहात साजरा करण्यात आला.
मन्नुसिंग रजपूत यांच्या ‘संकल्पनेतून ग्रामस्थांच्या सहकार्याने साकारलेल्या महादेव मंदिरात महाशिवरात्रीनिमित्त पहाटेपासून होमहवन, अभिषेक आणि महाआरती करण्यात आली.
त्यानंतर दिवसभर फराळ व महाप्रसादाचे वाटप करण्यात आले.हनुमान भजनी मंडळ (तिल्हेहाळ), हनुमान भजनी मंडळ (आलेगांव), हनुमान महिला भजनी मंडळ (दमाणी नगर, सोलापूर), हनुमान भजनी मंडळ(हिपळे), रेवणसिध्द भजनी मंडळ (औज),यांचा भजनाचा अखंड कार्यक्रम सादर करण्यात आला. झुआरी सिमेंटचे हेडलबर्ग दीपक कक्कड, संभाजी अरमारचे संस्थापक श्रीकांत डांगे,कार्याध्यक्ष तथा नूतन नगरसेवक सोमपा शिवाजी वाघमोडे, नूतन पं.स. सदस्य अंबिकाताई पाटील,शिल्पाताई बिराजदार,सिध्दाराम चिवडशेट्टी यांच्या हस्ते महाआरती करण्यात आली.
रात्री प्रसिद्ध भारुडकार ह.भ.प.पांडुरंग गवळी (भालेवाडीकर), ह.भ.प.रघुनाथ बिराजदार (बिदरकर), ह.भ.प. संभाजी झरे (लातूरकर) यांचा भारुडाचा कार्यक्रम सादर करण्यात आला. सोमवारी सकाळी ८ वाजता जाते. जि.प.नूतन सदस्य रामप्पा चिवडशेट्टी यांच्या हस्ते महाआरती करण्यात आली, त्यानंतर सुनीलसिंह सज्जनसिंह चौहान (नांदेड) यांच्यातर्फे महाप्रसादाचे वाटप करण्यात आले.यावेळी तिल्हेहाळ, औज (आ.), आलेगाव, होटगी स्टेशन,बोरुळ, आहेरवाडी, फताटेवडी, सोलापूर आदी भागातील भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते.






















