सोलापूर : भारतीय बौद्ध महासभा सोलापूर पूर्व विभाग, पुरुष-महिला व शहर शाखेच्या वतीने क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांची १९९वी जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. यानिमित्त महात्मा ज्योतिराव फुले यांच्या अर्धपुतळ्यास जिल्हा सरचिटणीस बाबासाहेब क्षिरसागर, कोषाध्यक्ष दत्तात्रय सिद्ध, गणेश धम्म, रक्षिता कांबळे आणि शारदाताई गजभिये यांच्या हस्ते पुष्पमाला अर्पण करून अभिवादन करण्यात आले.
यानंतर उपस्थितांनी सामुदायिकरित्या त्रिसरण पंचशील ग्रहण केले. समता सैनिक दलाचे जिल्हाप्रमुख यशवंत साबळे व शहर प्रमुख बाबू रणखांबे यांच्या मार्गदर्शनाखाली मानवंदना देण्यात आली. कार्यक्रमात शारदाताई गजभिये आणि बाबासाहेब क्षिरसागर यांनी मनोगत व्यक्त करत महात्मा फुले यांच्या सामाजिक कार्याची आठवण करून देत त्यांच्या विचारांचा वारसा पुढे नेण्याचे आवाहन केले.
या प्रसंगी मेजर गौतम जगताप, सुमेध डोलारे, विजय साळवे, मीनाक्षी कांबळे, अण्णासाहेब वाघमारे, नागसेन माने, बुद्धरत्न लंकेश्वर, राजेंद्र माने, प्रसाद लांबतुरे, अविनाश वाघमारे, आशा शिवशरण, कमल सोनवणे, संजीव दुपारगुडे, रेखा दुपारगुडे, महेंद्र काटे, सोमनाथ गायकवाड आदी उपस्थित होते.कार्यक्रमाच्या शेवटी उपस्थितांना लाडू वाटप करण्यात आले.
—

























