टेंभुर्णी – ज्ञानदीप शिक्षण संस्था टेंभुर्णी संचलित, महात्मा फुले ज्युनिअर कॉलेजच्या विद्यार्थ्यांनी जेईई मेन्स २०२६ (सेशन 1) परीक्षेत चमकदार कामगिरी करत कॉलेजच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला आहे. लातूर, पुणे आणि कोटा येथील नामांकित संस्थांप्रमाणेच आता ग्रामीण भागातील टेंभुर्णीमध्येही दर्जेदार शिक्षण उपलब्ध होत असल्याचे महात्मा फुले ज्युनिअर कॉलेज च्या या निकालाने सिद्ध केले आहे.
या परीक्षेत महाविद्यालयातील अनेक विद्यार्थ्यांनी यश संपादन केले असून, विद्यार्थ्यांनी उच्चांकी गुण मिळवले आहेत. ग्रामीण भागातील सुप्रिया अटकळे, प्रथमेश गवळी, दत्तात्रय भानवसे यांच्या सह चार विद्यार्थी जेईई अँडव्हान्सड (JEE Advanced) परीक्षेसाठी साठी पात्र झाले आहेत त्यामुळे ग्रामीण भागातील या विद्यार्थ्यांचे व महात्मा फुले ज्युनिअर कॉलेज चे सर्व स्तरातून कौतुक होत आहे.
सुप्रिया सोमनाथ अटकळे हिने फिजिक्समध्ये ९५.०९ पर्सेंटाईल आणि केमिस्ट्रीमध्ये ९२.४३ पर्सेंटाईल व एकूण पी सी एम मध्ये ९३.२१ पर्सेंटाईल मिळवले आहेत. प्रथमेश दत्तात्रय गवळी याने फिजिक्समध्ये ९६.९७ पर्सेंटाईल व एकूण पी सी एम मध्ये ९१.०१ पर्सेंटाईल मिळवले आहेत. दत्तात्रय सोमनाथ भानवसे याने फिजिक्समध्ये ९५.०९ पर्सेंटाईल मिळवत एकूण पी सी एम मध्ये ९०.४९ पर्सेंटाईल मिळवले आहेत. हे सर्व विद्यार्थी महात्मा फुले ज्युनिअर कॉलेजचे नियमित विद्यार्थी होते.
ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांनी प्रतिकूल परिस्थितीवर मात करत राष्ट्रीय स्तरावरील परीक्षेत मिळवलेले हे यश कौतुकास्पद आहे. या यशाबद्दल संस्थेचे संस्थापक अध्यक्ष नारायण भानवसे सर, प्राचार्य विजय यादव सर, मुख्याध्यापक शोएब बागवान सर, मार्गदर्शक शिक्षक श्री अक्षय लोंढे सर, सौ सोनाली गवळी मॅडम, श्री संदीप लोंढे सर शिक्षक पालक संघ, संस्थेतील सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी व ग्रामस्थ यांचेकडून सर्व विद्यार्थ्यांचे कौतुक व अभिनंदन करण्यात आले.
ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांमध्ये प्रचंड जिद्द आणि कष्ट करण्याची तयारी असते. त्यांना योग्य दिशा मिळाली, तर ते पुणे, लातूर किंवा कोटा येथील विद्यार्थ्यांच्या तोडीस तोड कामगिरी करू शकतात, हे आमच्या विद्यार्थ्यांनी ‘जेईई मेन्स’च्या निकालातून सिद्ध केले आहे, अनेकदा ग्रामीण भागातील मुलांना मोठ्या शहरात जाऊन शिक्षण घेणे आर्थिकदृष्ट्या शक्य नसते. हीच उणीव भरून काढण्यासाठी आम्ही टेंभुर्णीत JEE/NEET व MHT-CET चे वर्ग सुरू केले आहेत, ज्याचा फायदा आज या गुणवंत विद्यार्थ्यांना झाला आहे. हे यश विद्यार्थ्यांच्या कष्टाचे, शिक्षकांच्या प्रयत्नांचे तर पालकांच्या विश्वासाचे आहे.
नारायण भानवसे सर (संस्थापक अध्यक्ष)

























