Thursday, February 26, 2026
dainiktarunbharat.com
Solapur Tarun Bharat
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
No Result
View All Result
dainiktarunbharat.com
No Result
View All Result

‘आयपीपीएआय’च्या राष्ट्रीय परिषदेत महावितरणचा सहा पुरस्कारांनी गौरव

तरुण भारतbyतरुण भारत
January 12, 2026
in mumbai
0
0
SHARES
4
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

मुंबई : इंडिपेन्डंट पॉवर प्रोड्यूसर असोसिएशन ऑफ इंडियाच्या (IPPAI) २६ व्या राष्ट्रीय रेग्युलेटर्स अॅण्ड पॉलिसी मेकर्स परिषदेत महावितरणला ऊर्जा क्षेत्रातील अग्रगण्य ‘आयपीपीएआय पॉवर अवॉर्ड्स-२०२६’ मध्ये विविध सहा पुरस्कारांनी शनिवारी (दि. १०) गौरविण्यात आले. यात विशेषतः स्मार्ट ग्रिड, रूफटॉप सोलर, बॅटरी स्टोरेज आणि विद्युत वाहन प्रोत्साहन या वर्गवारीमध्ये महाराष्ट्राने देशात अव्वल स्थान पटकावले.

‘महावितरणने तंत्रज्ञान आणि अक्षय ऊर्जा क्षेत्रात घेतलेली झेप विद्युत क्षेत्रात मोठे बदल घडवून आणत आहे. हे पुरस्कार त्याची पावती आहे‘, अशी प्रतिक्रिया देत महावितरणचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक श्री. लोकेश चंद्र यांनी सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांचे अभिनंदन केले. 

इंडिपेन्डंट पॉवर प्रोड्यूसर असोसिएशन ऑफ इंडियाच्या (IPPAI) वतीने बेळगाव (कर्नाटक) येथे दि. ७ ते १० जानेवारीला २६ व्या राष्ट्रीय रेग्युलेटर्स अॅण्ड पॉलिसीमेकर्स परिषदेचे आयोजन करण्यात आले. राज्याच्या अपर मुख्य सचिव (ऊर्जा) श्रीमती आभा शुक्ला, महावितरणचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक श्री. लोकेश चंद्र यांच्या नेतृत्वात महावितरणने केलेल्या विविध कामगिरीचा विविध पुरस्कारांनी गौरव करण्यात आला. यात १) स्मार्ट ग्रिड सोल्यूशन्सच्या अंमलबजावणीसाठी सर्वोत्तम उपयुक्तता (विजेता), २) छतावरील सौर ऊर्जा निर्मितीला प्रोत्साहन देणारे सर्वोत्तम राज्य (विजेता), ३) सर्वोत्तम बॅटरी स्टोरेज प्रकल्प (विजेता), ४) ऊर्जा संवर्धन आणि ऊर्जा साठवणूक तंत्र- आयटी अप्लिकेशन (नवोपक्रम पुरस्कार), ५) इलेक्ट्रिक वाहनांना प्रोत्साहन देणारे सर्वोत्तम राज्य (विजेता) आणि ६) ग्रीन हायड्रोजन आणि अमोनिया नियोजनातील सर्वोत्तम राज्य (उपविजेता) या पुरस्कारांनी गौरविण्यात आले.

माजी केंद्रीय मंत्री श्री. सुरेश प्रभू, केंद्रीय विद्युत प्राधिकरणाचे अध्यक्ष श्री. घनशाम प्रसाद, ऑल इंडिया डिस्कॉम असोसिएशनचे महासंचालक व केंद्रीय माजी ऊर्जा सचिव श्री. अलोक कुमार, पॉवर सिस्टम ऑपरेशन कॉर्पोरेशनचे माजी महासंचालक श्री. सुशील कुमार सुनी, महाराष्ट्राचे सेवानिवृत्त मुख्य सचिव श्री. अजोय मेहता यांची प्रमुख उपस्थिती होती. त्यांच्याहस्ते महावितरणच्या वतीने मुख्य अभियंता श्री. संदीप पाटील, अधीक्षक अभियंता श्री. अमित कुलकर्णी, श्री. अनिल गेडाम, कार्यकारी अभियंता श्री. संजय गवळी, श्री. संजय गायकवाड, जनसंपर्क अधिकारी श्री. विश्वजीत भोसले, उपकार्यकारी अभियंता श्री. प्रसाद दिवाण, श्री. राजेंद्र सूर्यवंशी, सहाय्यक अभियंता श्री. कपिल जाधव, श्री. पवन देशपांडे यांनी पुरस्कार स्वीकारले.

या परिषदेत वितरण व पारेषण नियोजन, अक्षय ऊर्जेला (सौर व पवन) प्राधान्याने ग्रीडमध्ये सामावून घेताना येणारा ताण व आव्हाने, मागणीचा अंदाज आणि संसाधन पर्याप्तता नियोजन, बॅटरी एनर्जी स्टोरेज सिस्टम्स, वीज वितरण कंपन्यांची आर्थिक स्थिती मजबूत करण्याच्या उपाययोजना, उदयोन्मुख तंत्रज्ञान व आर्टिफिशियल इंटेलिजन्स व मशीन लर्निंग आदींवर चर्चा करण्यात आली. राज्य विद्युत नियामक आयोगांचे अध्यक्ष, वीज वितरण, पारेषण, निर्मिती व लोड डिस्पॅच सेंटर्संचे वरिष्ठ अधिकारी, अक्षय ऊर्जा, वित्तीय संस्था आदींचे देशभरातील सुमारे ५०० प्रतिनिधी उपस्थित होते.

फोटो नेम – MSEDCL – IPPAI National Award 2026

फोटो ओळ – इंडिपेन्डंट पॉवर प्रोड्यूसर असोसिएशन ऑफ इंडियाच्या बेळगाव (कर्नाटक) येथील राष्ट्रीय परिषदेत महावितरणला विविध क्षेत्रातील सहा पुरस्कारांनी गौरविण्यात आले. मुख्य अभियंता श्री. संदीप पाटील, अधीक्षक अभियंता श्री. अमित कुलकर्णी, श्री. अनिल गेडाम व सहकाऱ्यांनी हे पुरस्कार स्विकारले.

Post Views: 33
Previous Post

व्हि-एक्सल एज्युकेशन ट्रस्ट सोलापूर सेंटरचा क्रीडा महोत्सव उत्साहात साजरा

Next Post

ब्रिमा सागर डिस्टलरी तर्फे श्रीपूरच्या पत्रकारांचा सन्मान

तरुण भारत

तरुण भारत

Next Post

ब्रिमा सागर डिस्टलरी तर्फे श्रीपूरच्या पत्रकारांचा सन्मान

ताज्या बातम्या

सोयगाव येथे आई महोत्सावा निमित्त जि.परिषद केंद्र प्राथमिक शाळा येथील विद्यार्थ्यांची मोफत दंत तपासणी

February 26, 2026

बापरे ssss.. शहर जिल्ह्यात तापमानाचा पारा वाढला.. #public #marathinews #viral #temperature #mh13

February 26, 2026

रेणापूर मध्ये महिला बचत गटाचे एक दिवसीय प्रशिक्षण संपन्न.#public #viral

February 26, 2026

अरुण रोडगे दोन वर्षाकरिता तडीपार. #public #marathinews #mh13newssolapur #tadipaar #crime

February 26, 2026

सोलापूरकरांनो गावाला जाताना सीसीटीव्ही आणि चॅनल लॉक ठेवाच. #public #marathinews #चोरी #robbery

February 26, 2026

अजित पवार अपघात प्रकरणी आ. रोहित पवार योगेंद्र पवार बारामती पोलीस ठाण्यात.#public #ajitpawar #viral

February 26, 2026

शिवसेनेच्या अल्पसंख्यांक नेत्यांची मुजोरी. #public #solapurnews #marathinews #maharashtranews

February 26, 2026

कोठेंनी अधिवेशनात मांडला सोलापूरकरांचा विषय. #public #marathinews #solapurnews #viral #solapurnews

February 26, 2026

फेसबुक पेज

मनोरंजन

‘लास्ट स्टॉप खांदा’ चित्रपटाचा दमदार ट्रेलर लाँच ; २१ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला

byतरुण भारत
November 12, 2025
0

सोलापूर - सध्या जोरदार चर्चेत असलेल्या 'लास्ट स्टॉप खांदा...' या चित्रपटातून प्रेमाचा इमोशनल, कॉमेडी ड्रामा उलगडणार आहे.उत्तम लेखन,अभिनय,संगीत असलेला,पुरेपूर मनोरंजन...

दिल्लीसह 26 राज्यांमध्ये अतिवृष्टीचा इशारा

राज्यभरात पुढील चार दिवस अतिवृष्टीचा इशारा!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 16, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ मुंबई :  राज्यात गेल्या दोन दिवसापासून सुरू असलेली पावसाची संततधार  पुढील चार दिवस कायम रहाणार आहे. २१...

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 11, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ तामसा : तामसा येथे जागतिक आदिवासी दिनाच्या औचित्याने आदिवासी समाजाकडून आदिवासी संस्कृतीचे दर्शन घडविण्यात आले. येथील नवीन...

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  प्रायोगिक रंगभूमीला भक्कम आणि सशक्त बनवण्यासाठी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेने 'प्रायोगिक रंगमंच संघ' मुंबई या संस्थेला...

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज : वाद निर्माण होतील असे चित्रपट बनवायचे म्हणजे त्याविषयी समाजात मोठ्या प्रमाणात चर्चा होते, त्याचा निषेध केला...

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 29, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत ग्रामीण विकास, महिला सुरक्षा, शेती बाजारपेठ, जलसंपदा आणि...

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 23, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/श्याम ठाणेदार : मराठी चित्रपट आणि नाट्य सृष्टीतील जेष्ठ अभिनेते जयंत सावरकर यांचा दुसरा स्मृतिदिन. बरोबर एक वर्षापूर्वी...

Load More

राजकीय

आयटी पार्कसाठी २० हेक्टर जमीन औद्योगिक महामंडळाला हस्तांतरित करण्याचे आदेश

byतरुण भारत
February 22, 2026
0

सोलापूर : आयटी पार्कसाठी होटगी येथील गट नंबर ५७६ मधील २० हेक्टर (५० एकर) जमीन औद्योगिक महामंडळाला हस्तांतरित करण्याचे आदेश...

राहुल गांधींच्या प्रतिमेला ‘जोडे मारो’ आंदोलन

byतरुण भारत
February 22, 2026
0

सोलापूर - देशाचे तंत्रवैभव जगासमोर मांडणाऱ्या 'इंडिया एआय इम्पॅक्ट समिट'मध्ये युथ काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी केलेल्या गोंधळाचे पडसाद आता सोलापुरात उमटू लागले...

राष्ट्रवादी प्रदेश सचिव पदी अॅंड विजयसिंह गिड्डे 

byतरुण भारत
February 19, 2026
0

मोडनिंब - राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाच्या प्रदेश सचिव पदी  मोडनिंब (ता. माढा) येथील अॅंड विजयसिंह गिड्डे यांची निवड झाली...

कार्यकर्त्यांच्या एकजुटीमुळे हत्तूरचा बालेकिल्ला शिवसेनेच्या ताब्यात 

byतरुण भारत
February 15, 2026
0

दक्षिण सोलापूर - लाडकी बहीण व भाजपच्या लाटेतही हत्तूरचा बालेकिल्ला ताब्यात ठेवण्यात शिवसेनेला यश आला आहे. जिल्हाप्रमुख अमर पाटील यांची...

Load More

आमच्याबद्दल

dainiktarunbharat.com

“सोलापूर तरुण भारत” हे नाव सोलापूर, धाराशिव, लातूर, नांदेड, जालना, बीदर, गुलबर्गा, संभाजीनगर (औरंगाबाद ), सातारा, सांगली, कोल्हापूर या जिल्ह्यात सर्वांच्या परिचयाचे आहे. वाचकांच्या प्रेमाचे आणि ‘तरुण भारत’ने सांभाळलेल्या मूल्यांचेच हे यश आहे.
यशाला शेवटचा असा टप्पा नसतो. त्यामुळेच आता प्रत्येकाच्या हातातील स्मार्ट फोनवर, टेबलवरील कॉम्प्युटर स्क्रीनवर ‘तरुण भारत’ वाचता येईल. जगभरातील वाचकांना ‘तरुण भारत’ वेब आवृत्तीच्या स्वरुपात नव्या तंत्रज्ञानाच्या सहाय्याने उपलब्ध होत आहे.

Subscribe Our Youtube Channel

वेबसाईट दर्शक

0706217

वृत्त संग्रह

February 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
232425262728  
« Jan    
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy
  • Cancellation / Refund policy
  • Shipping Policy
  • Terms and Conditions

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories

© Website Design by Digital Buffalo - 9028927697