सोलापूर – भारतीय जनता पार्टीच्या युवा मोर्चा सोलापूर जिल्हा अध्यक्षपदी महेश बिराजदार यांची निवड करण्यात आली आहे.ही निवड भारतीय जनता पार्टीचे जिल्हाध्यक्ष श्री.शशिकांत चव्हाण यांच्या हस्ते जाहीर करण्यात आली. सोलापूर पत्रकार श्रमिक संघ येथे घेण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत या नियुक्तीची औपचारिक घोषणा करण्यात आली.
या प्रसंगी पक्षाचे पदाधिकारी, युवा मोर्चाचे कार्यकर्ते आणि स्थानिक कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.निवड झाल्यानंतर बोलताना महेश बिराजदार यांनी सांगितले की,“ही जबाबदारी माझ्यासाठी सन्मानाची आणि अभिमानाची आहे. पक्षाच्या विचारधारेनुसार संघटनेचा विस्तार,तरुणांचा सहभाग आणि सशक्त नेतृत्व तयार करण्यासाठी मी पूर्ण ताकदीने काम करणार आहे.पक्षाचा विश्वास संपादन करून सोलापूर जिल्ह्यातील युवकांना अधिक सक्षम बनवणे हा माझा संकल्प आहे.”
नवीन जिल्हा अध्यक्षपदी महेश बिराजदार यांच्या निवडीबद्दल सर्व स्तरांतून अभिनंदनाचा वर्षाव होत असून
त्यांच्या नेतृत्वाखाली युवा मोर्चा आणखी बळकट होईल, असा विश्वास कार्यकर्त्यांनी व्यक्त केला आहे.


























