महिंद्रा अँड महिंद्रा लिमिटेडची उपकंपनी असलेल्या महिंद्रा लास्ट माईल मोबिलिटी लिमिटेडने (MLMML) आर्थिक वर्ष 2024 मध्ये एक मोठा टप्पा गाठत, इलेक्ट्रिक तीन-चाकी वाहनांच्या मार्केटमध्ये वर्चस्व कायम ठेवले आहे. MLMML ही भारतातील नंबर 1** इलेक्ट्रिक तीन-चाकी वाहन उत्पादक कंपनी ठरली. कंपनीने आजपर्यंत 1.4 लाख* इलेक्ट्रिक वाहनांची विक्री केली आहे. भारतातील इलेक्ट्रिक तीन-चाकी वाहन मार्केटमध्ये MLMML चा सध्या 9.3%* मार्केट शेअर आहे.2024 या आर्थिक वर्षात L5 EV श्रेणीमध्ये MLMML 55.1%** मार्केट शेअरसह आघाडीवर आहे.
केवळ आठ महिन्यात, MLMML ने 40000* EVs विकून उल्लेखनीय यश मिळवले आहे. ट्रिओ प्लस तसेच ई-अल्फा सुपर रिक्षा ही दोन नवीन उत्पादने आणि कार्गो प्रकारचे वाहन या दोन नवीन उत्पादनांच्या लाँचमुळे हे यश मिळवता आले. ही महत्त्वपूर्ण उपलब्धी महिंद्राच्या इलेक्ट्रिक वाहनांच्या वाढत्या मागणीतून दिसून येते. तसेच टिकाऊ लास्ट-माईल मोबिलिटी सोल्यूशन्ससाठी कंपनीच्या वचनबद्धतेची प्रचिती येते. तीनचाकी वाहनांची ही सततची मागणी पूर्ण करण्यासाठी, उत्पादनात तिप्पट वाढ करण्यात आली आहे. MLMML च्या वाहनांचे उत्पादन बेंगळुरू, हरिद्वार आणि झहीराबाद येथे होते.
MLMML द्वारे ऑफर केलेल्या तीन-चाकी ईव्हीच्या विविध श्रेणींमध्ये Treo, Treo Plus, Treo Zor, Treo Yaari, Zor Grand, e-Alfa Super, आणि e-Alfa Cargo यांचा समावेश आहे.
MLMMLच्या एमडी आणि सीईओ श्रीमती सुमन मिश्रा म्हणाल्या, “आर्थिक वर्ष 24 मध्ये, आमच्या ग्राहक केंद्रीत दृष्टिकोनामुळे लास्ट माईल मोबिलीटी स्पेसचे इलेक्ट्रिफिकेशन करण्यासाठी आमचे प्रयत्न अधिक तीव्र करण्यात मदत झाली आहे. आठ महिन्यांत 40000* ई-3-व्हीलरची विक्री आमच्या EVs चालकांना दिलेल्या सर्वसमावेशक उत्पादनाची प्रचिती देते. आम्ही सातत्याने मौल्यवान, नाविन्यपूर्ण आणि टिकाऊ लास्ट माईल मोबिलिटी सोल्यूशन्स वितरीत करून आमच्या ग्राहकांचे जीवन सुधारण्यासाठी वचनबद्ध आहोत.”
कंपनीच्या ग्राहक-केंद्रित दृष्टिकोनाचा एक भाग म्हणून, महिंद्रा लास्ट माईल मोबिलिटी लिमिटेड UDAY प्रोग्राम ऑफर करते. हा प्रोग्राम, MLMML EV खरेदी केल्यावर, चालकांना पहिल्या वर्षासाठी ₹ 10 लाखांचा अपघात विमा संरक्षण प्रदान करतो. हा प्रोग्राम महिंद्राच्या ग्राहकांची सुरक्षितता आणि कल्याण सुनिश्चित करण्याच्या समर्पणावर भर देतो.