सोलापूर – मंद्रूपचे तहसीलदार सुजित नरहरे यांची हिंगोली येथे सहायक मुद्रांक जिल्हाधिकारी म्हणून पदोन्नती झाल्याने गडहिंग्लजचे नायब तहसीलदार विष्णू नामदेव बुटे यांची मंद्रूपचे तहसीलदार म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
शुक्रवारी तहसीलदार बुटे यांनी पदभार स्वीकारला. तासगाव तालुक्यातील विसापूर येथील बुटे यांनी यापूर्वी सांगोला ,माढा, भुदरगड व गडहिंग्लज येथे
नायब तहसीलदार म्हणून उत्कृष्ट काम केला आहे. त्यामुळे त्यांना कोल्हापूर व पुणे विभागीय उत्कृष्ट तहसीलदार म्हणून पुरस्कार मिळाला आहे. महिन्यापूर्वी मंद्रूप अप्पर तहसील कार्यालय येथे तहसीलदार म्हणून पदोन्नती मिळाली आहे.
शेतकरीमित्र म्हणून काम करणार …
शेतकर्यांची रस्ते, जमीन वाटप व शेतीविषयक विविध तक्रारी आहेत. शेतकर्यांच्या कामांना प्राधान्य देऊन नागरीक व प्रशासन यामध्ये सुसंवाद निर्माण करण्यासाठी काम करणार आहे. तसेच तहसील कार्यालयातील प्रलंबित कामे मार्गी लावून शेतकरीमित्र तहसीलदार म्हणून काम करणार असल्याचे तहसीलदार विष्णु बुटे यांनी सांगितले.

























