सोलापूर – दक्षिण सोलापूर तालुक्यातील मंद्रुपचे सुपुत्र नौशाद शहाजहान काझी यांनी महाराष्ट्र लोकसेवा आयोग परिक्षेत उत्तीर्ण होवून वर्ग १ अधिकारी होण्याचा मान पटकावला आहे. काझी यांनी मिळवलेल्या यशाबद्दल मंद्रुपकरांमध्ये उत्साह आणि अभिमानाची बाब मानली जात आहे. मंद्रुपच्या जिल्हा परिषद शाळेत शिकणारा विद्यार्थी क्लास वन अधिकारी बनल्याने सर्वत्र कौतुक होत आहे.
मंद्रुपकरांच्या ओठातून मंद्रुप मधूनही वर्ग १ अधिकारी व्हावे अशी इच्छा व्यक्त होत होती. ती ईच्छा नौशाद काझी यांच्या माध्यमातून प्रत्यक्षात
पूर्ण होवून सुरवात झाली. काझी यांचे प्राथमिक शिक्षण मंद्रूप जिल्हा परिषद शाळेत झालू असून माध्यमिक शिक्षण महात्मा फुले विद्यालय येथे झाली आहे. महाविद्यालयीन शिक्षण सोलापूर व छत्रपती संभाजीनगर येथून पूर्ण केला आहे. काझी यांचे वडील शहाजहान काझी यांनी संपत्तीपेक्षा मुलांच्या शिक्षणाला महत्त्व दिल्याने मंद्रुपमधील एक सुशिक्षित कुटुंब म्हणूनही त्यांच्याकडे पाहिले जाते. नौशाद काझी यांचे बंधू आसिफ काझी हे मुंबई पोलीस दलात सेवा करीत आहेत. काझी यांनी मिळवलेल्या यशाबद्दल मंद्रुपकरांकडून शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.
….
…
मंद्रुपमधील पहिला वर्ग १ अधिकारी
..
नौशाद काझी हे सध्या मंत्रालयात सहायक कक्ष अधिकारी म्हणून काम करीत होते. शासकीय सेवा करताना एमपीएससी परीक्षेत उत्तीर्ण झाल्याने मंद्रुपमध्ये पहिला क्लास वन अधिकारी होण्याचा मान मिळाला आहे. त्यामुळे मंद्रुपच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला आहे.

















