नांदेड / माहूर – संभाजी ब्रिगेड पार्टी माहूर तालुका अध्यक्षपदी मंगेश पाटिल जाधव यांची नियुक्ती करण्यात आली आहे. ०३ नोव्हेंबर रोजी या संदर्भातील नियुक्तीपत्र संभाजी ब्रिगेड पार्टी,जिल्हा अध्यक्ष नांदेड उत्तर कमलेश पाटील कदम यांनी त्यांना दिले आहे.
संभाजी ब्रिगेड या वैचारीक, सामाजिक व राजकीय चळवळीसाठी श्रम, वेळ, बुध्दी, कौशल्य व पैसा हे पंचदान देऊन पक्ष संघटनेत सातत्याने कार्यरत असल्याचे नियुक्तीपत्रात मंगेश पाटील जाधव यांच्या विषयी म्हटले असून,त्यांच्या या कार्याची विशेष दखल घेऊन जिल्हा अध्यक्ष कमलेश पाटील कदम यांनी त्यांची संभाजी ब्रिगेड पार्टी माहूर तालुका अध्यक्षपदी नियुक्ती केली आहे.आपल्या विचारकार्यातून पक्ष संघटन व समाज संघटन बळकट होईल.महामानवांच्या विचारांची समतावादी व्यवस्था निर्माण होण्यासाठी आपले योगदान महत्वाचे ठरणार असल्याचा विश्वास जिल्हाध्यक्षांनी व्यक्त केला आहे.
अटी व शर्तीच्या अधिन असलेली ही नियुक्ती केवळ सहा महिन्याच्या कालावधीसाठी असून या काळातील कामगिरीचा आढावा घेऊन पुढील काळासाठी ही नियुक्ती कायम करण्यात येणार आहे. संभाजी ब्रिगेड पार्टीचे नवनियुक्त माहूर तालुका अध्यक्ष मंगेश पाटील जाधव यांना पुढील कार्यासाठी हार्दिक शुभेच्छा,कमलेश पाटील कदम जिल्हाध्यक्ष, संभाजी ब्रिगेड, नांदेड़ उत्तर
यांनी दिल्या आहेत. तर या नियुक्ती बद्दल माहूर/किनवटसह परिसरातील स्नेहांकितांकडून मंगेश पाटील जाधव यांचे अभिनंदन करण्यात येत आहे.




















