धाराशिव – आंबा मोहोर लागण्यास सुरुवात,
उन्हाळ्याची गोडवा निर्माण करणारे पाहुणे लवकरच आपल्या भेटीला येत आहेत,
महाराष्ट्रात वाशी व वाशी परिसरातील आंबा उत्पादन नंबर एकचे असून वाशी हे आंब्यासाठी प्रसिद्ध ठिकाण आहे येथील गावरान आंबे अतिशय रुचकर असून यांना पूर्ण महाराष्ट्रात मागणी आहे.
डिसेंबर अखेर 100% गावरान व नामांकित कंपनीच्या संकरित आंबे उदाहरणात केशर ,रत्ना ,हापूस या वेगवेगळ्या व्हरायटीचे आंबे उत्पादक वाशी तालुक्यात तरुण शेतकरी वर्ग निर्माण झाला असून भरपूर मेहनत करून आंबा उत्पादन घेतात ह्या वर्षी वातावरण व भरपूर पर्जन्यवृष्टी झाल्यामुळे आणि थंडी भरपूर असल्यामुळे ह्या वर्षी आंबा उत्पादन चांगले होण्याची शक्यता असून यावर्षी वाशी परिसरात आंब्यांना मोहर येण्यास सुरुवात झालेली आहे,
आंबा उत्पादन शेतकरी धनंजय कुलकर्णी व सतीश कुलकर्णी तांदळवाडी यांचे साडेबाराशे केशर आंब्याचे झाडे असून यावर्षीआंबा उत्पादन चांगले होण्याची शक्यता आहे.
परंतु धनंजय कुलकर्णी असे म्हणतात की बाजारपेठ जवळ नसल्यामुळे आंबा उत्पादक शेतकऱ्यांची फार मोठे नुकसान होत असून वाशी तालुक्यात आंबा आंब्यासाठी व इतर फळ पिकांसाठी व्यापारी व बाजारपेठ तयार होणे गरजेचे आहे.


























