बार्शी – गोवा येथे ९ नोव्हेंबरला झालेल्या जागतिक आयर्न मॅन स्पर्धेमध्ये ३० देशातील सुमारे १६०० स्पर्धकांनी सहभाग घेतला होता. जगातील सर्वात कठीण स्पर्धांपैकी एक स्पर्धा मानली जाते ज्याला ट्रायथलॉन असे म्हणतात.
१.९ कि.मी. पोहणे, ९० कि. मी. सायकल चालवणे, २१.१ कि.मी. रनिंग या तिन्ही गोष्टी ८ तास ३० मिनिटांमध्ये पूर्ण करण्याचे आवाहन या स्पर्धेमध्ये असते. या स्पर्धेत बार्शी शहरातून माणिक हजारे, अमोल ताकभाते, प्रकाश फुरडे, डॉ.नवदीप लोकरे आदींनी सहभाग घेतला होता.
या स्पर्धेत माणिक हजारे यांनी ८ तास ३० मिनिटांचे आवाहन केवळ ७ तास १८ मि. आणि १२ सेकंदात पूर्ण केले.
या जागतिक स्पर्धेत नवा विक्रम प्रस्थापित करुन बार्शी तालुक्याचे नाव उंचावल्याबद्दल त्यांचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे.

















