पिलीव – माळशिरस तालुक्यातील तांदुळवाडी पंचायत समिती गणातुन मनीषा अमोल मदने पाटील यांनी भाजपच्या वैशाली फुलारे यांचा अवघ्या तिस मताने पराभव केला .खरेतर मनीषा मदने यांना स्वतचा पिलीव जिल्ह्य परिषद गट सोडुन त्यांना उचलून तांदुळवाडी पंचायत समिती गणातुन राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाकडून उमेदवारी देण्यात आली .खरेतर त्यांच्यासाठी हा नवखा मतदारसंघ प्रचारासाठी अगदी थोडेच दिवस यामध्ये मळोली, तांदुळवाडी, फळवणी, काळमवाडी, साळमुखवाडी या गावांचा या पंचायत समिती गणात समावेश आहे.या नवख्या असणाऱ्या गावातही त्यांनी 30 मताने विजय खेचून आणला .मनीषा मदने यांचे पती अमोल मदने हे पिलीव ग्रामपंचायत मध्ये फक्त एका मतानी विजय खेचून आणला होता.त्यांनी अडीच वर्ष पिलीव गावचे सरपंच पद भूषविले होते . अमोल मदने यांचे आजोबा स्व बाबुराव पांडुरंग मदने _ पाटील यांनीही पंचायत समितीचे सदस्य पद भूषविले होते .मनीषा मदने याच्या विजयाबद्दल गुलाल उधळून व फटाके वाजवून कार्यकर्त्यांतमधुन आनंद व्यक्त केला जात आहे . फोटो _ मनीषा मदने
‘लास्ट स्टॉप खांदा’ चित्रपटाचा दमदार ट्रेलर लाँच ; २१ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला
सोलापूर - सध्या जोरदार चर्चेत असलेल्या 'लास्ट स्टॉप खांदा...' या चित्रपटातून प्रेमाचा इमोशनल, कॉमेडी ड्रामा उलगडणार आहे.उत्तम लेखन,अभिनय,संगीत असलेला,पुरेपूर मनोरंजन...

























