मुखेड / नांदेड – भारतीय जनता पार्टी च्या आ.डाॅ.तुषार राठोड यांच्या नेञत्वात मुखेड येथे झालेल्या कार्यकर्ता मेळाव्यात बा-हाळी मंडळ अनुसूचित जाती अध्यक्ष पदावर मनोज गोविंदराव कांबळे सावरगावकर यांची नियुक्ती करण्यात आली असुन नियुक्तीचे पत्र भाजप बा-हाळी मंडळ अध्यक्ष बालाजी पाटील सकनुरकर यांनी दिली
मनोज कांबळे यांनी मागील काळात भाजपाचे आमदार डाॅ.तुषार राठोड यांच्या नेञत्वात
सामाजिक, राजकिय क्षेञात केलेल्या महत्वपूर्ण कामाची दखल घेऊन ही नियुक्ती दिली आहे.
दिलेल्या नियुक्ती मुळे पक्ष संघटन अधिक मजबूत करण्यास तसेच पक्षविस्तारासाठी यांचे काम उल्लेखनीय रहाणार आहे.
या नियुक्तीबद्दल मनोज कांबळे यांचे विविध स्तरातून अभिनंदन होत असून, त्यांच्या पुढील कार्यास अनेकांनी शुभेच्छा देत आहेत.

















