सोलापूर – नागरिकांना लागणाऱ्या रोजच्या जीवनामध्ये महत्त्वाची कागदपत्रे काढण्याचे राहिलेल्यांसाठी महासेवा शिबिर हे एक उत्तम कार्य माजी नगरसेवक जिल्हाप्रमुख अमोल शिंदे हे यांच्या हातून होत आहे. येणाऱ्या काळात त्यांच्या हातून असे अनेक समाजकार्य घडो अशा शब्दात सोलापूर भाजप युवा मोर्चाचे अध्यक्ष माजी नगरसेवक किरण देशमुख यांनी कौतुक केले.
छत्रपती शिवाजी महाराज चौक येथील शिवसेना शहर जिल्हा कार्यालय येथे जिल्हाप्रमुख अमोल शिंदे यांच्या पुढाकारातून घेण्यात येणाऱ्या महासेवा शिबिराला शनिवार दि. १३ डिसेंबर रोजी माजी नगरसेवक किरण देशमुख यांनी व काँग्रेसचे माजी नगरसेवक विनोद भोसले यांनी सदिच्छा भेट दिली.

शिवसेना एकनाथ शिंदे गटाच्या वतीने विविध शासकीय योजनांचा लाभ एकाच ठिकाणी उपलब्ध करून देण्यासाठी महासेवा शिबिर घेण्यात आले. या शिबिराला नागरिकांचा प्रचंड प्रतिसाद मिळत आहे. ११ ते १४ डिसेंबर दरम्यान ठेवलेले शिबिर आता १८ डिसेंबर पर्यंत सकाळी १० ते सायंकाळी ६ वाजेपर्यंत छत्रपती शिवाजी महाराज चौक येथील शिवसेना शहर जिल्हा संपर्क कार्यालयात सुरू आहे.
यावेळी मोहसिन शेख, अमित अजनाळकर आदी उपस्थित होते.
अनंत दिघे सहाय्यक केंद्र योजनेचा लाभ जास्तीत जास्त नागरिकांनी घ्यावा
या शिबिरामध्ये विविध योजनांसोबत अनंत दिघे सहाय्यक केंद्र योजना नव्याने सुरू केली आहे. या मधून नागरिकांनी केंद्र आणि राज्य सरकारच्यावतीने ज्या योजना लागू होतात याची माहिती दिली जाते. याचा लाभ जास्तीत जास्त नागरिकांनी घ्यावा असे आवाहन करण्यात आले.
– आयोजक अमोल शिंदे



















