मंगळवेढा – आद्य क्रांतिकारक राघोजी भांगरे प्रणित आदिवासी कोळी महादेव डोंगर कोळी कोळी मल्हार टोकरे कोळी कोळी ढोर यांच्यावरील खरे खोटे असा भेदभाव करून जाणीवपूर्वक केल्या जाणाऱ्या दुजाभावाला वाचा फोडण्यासाठी सोलापूर जिल्ह्यातील सर्व कोळी महादेव जमात बांधवांनी आझाद मैदान मुंबई येथून 23 फेब्रुवारी रोजी सकाळी १० वाजता मोर्चा काढण्यात येणार आहे.
सोलापूर जिल्ह्यातील आदिवासी कोळी महादेव जमात बांधवांनी आपल्या हक्कासाठी अन्यायाला वाचा फोडण्यासाठी जाचक अटी रद्द झाल्या पाहिजे व 1950 पूर्वीच्या कोळी नोंदीवरून व 1950 च्या रहिवाशी पुराव्यावरून सुलभ पद्धतीने जात प्रमाणपत्र मिळण्यासाठी आपल्या हक्कासाठी आद्य क्रांतिकारक राघोजी भांगरे प्रणित सामाजिक संघटना दत्ताभाऊ सुरवसे यांच्या नेतृत्वाखाली मुंबईच्या आझाद मैदानावर 23 फेब्रुवारीला मोर्चा निघणार आहे.
तरी सोलापूर जिल्ह्यातील सर्व जमात बांधवांनी मोठ्या संख्येने मोर्चामध्ये सहभागी व्हावे असे आव्हान शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे युवासेना मंगळवेढा शहर प्रमुख अरविंद नाईकवाडी यांनी केले आहे


























