पिलीव – माळशिरस तालुक्यातील पिलीव येथील कर्मवीर भाऊराव पाटील विद्यालयात एकदिवसीय विद्यार्थ्यांचा बाजार दिवस आयोजित करण्यात आला होता.यामध्ये पाचवी ते सातवीमधील जवळपास चारशे विद्यार्थ्यांनी उस्फूर्तपणे सहभाग घेतला.विद्यार्थांनी यावेळी वेगवेगळ्या भाजीपाल्याचे, फळांचे,वेगवेगळे खाद्यपदार्थ, स्टेशनरी साहीत्य विक्री करणयासाठी सहभाग घेतला.
यावेळेस पिलीव परीसरातील पालक ,शिक्षक तसेच शिक्षणप्रेमींनी या बाजारात येऊन मोठ्याप्रमाणात खरेदी केली यामुळे विद्यार्थ्यांचा आनंद जास्तच द्विगुणित झाला.विद्यार्थ्यांना शालेय ज्ञानाबरोबरच व्यवहार ज्ञान आत्मसात व्हावे तसेच अगदी लहानपणापासूनच व्यवसायाची जाणीव व्हावी म्हणूनच या बाजार दिवसाचे आयोजन करण्यात आले होते.
या एकदिवसीय बाजारात लाखो रुपयांची उलाढाल झाली.खरेतर व्यवसाय करुन पैसे कसे मिळवायचे हा मुख्य उद्देश या बाजाराचा असुन शेतकऱ्यांच्या मुलांनी आपल्या शेतातील भाजीपाला तसेच फळे तर व्यावसायिकांच्या मुलांनी आपल्या व्यवसायातील खाद्यपदार्थ असो की किराणा माल ,जनरल स्टोअर्स मधील वस्तु ओरडून विक्री केले हा एक वेगळाच आनंद विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर ओसांडून वाहत होता.
या बाजारास आठवी ते बारावीपर्यंतचे विद्यार्थी ,पालक मिळुन दीड ते दोन हजार लोकांनी बाजारास भेट दिली. या एकदिवसीय बाजार दिवसाचे उद्घाटन विद्यालयाचे मुख्याध्यापक अशोक बागल सर व पर्यवेक्षक रमेश किरगत सर यांच्या हस्ते करण्यात आले.यावेळी शाळा व्यवस्थापन समितीचे संजय पाटील, वाघमारे सर ,झाडे सर ,जाधव सर ,शेगर सर ,मगर सर जाधव सर तसेच पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.बाजार यशस्वी करण्यासाठी सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारीवर्ग यांनी विशेष परिश्रम घेतले.पालक, शिक्षक, ग्रामस्थ, विद्यार्थी यांनी या बाजाराचा आनंद घेतला. फोटो _ कर्मवीर भाऊराव पाटील विद्यालयात बाजार दिवस.


















