भोकर(प्रतिनिधी) भोकर तालुका सरपंच संघटनेची नूतन कार्यकारिणी घोषित करण्यात आली असून सरपंच संघटनेच्या तालुका अध्यक्षपदी मारोती पाटील भोंबे यांची तर उपाध्यक्षपदी राघोबा पाटील सोळंके यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे.
ग्रामस्तरावर सरपंच म्हणून काम करित असताना गावातील समस्या शासन स्तरावर मांडण्याकरिता संघटन महत्वाचे असते यासाठी यापूर्वीची कार्यकारिणी अध्यक्ष माधव अमृतवाड असलेली बरखास्त करण्यात आली होती.
त्यानंतर १८ ऑगस्ट रोजी हॉटेल गणराज रिसॉर्ट येथे सरपंचांची बैठक घेऊन नूतन कार्यकारीनी निवडण्यात आली यावेळी बिनविरोध निवड करण्यात आली अध्यक्षपदी मारोती पाटील भोंबे, उपाध्यक्ष राघोबा पा. सोळंके, सचिव मोहन राठोड, सहसचिव दिलीप रायभोळे सल्लागार सुरेश पा. कल्याणकर, आनंदराव पा. रावणगावकर, जयवंतराव खूपसे, रमेश संगपवाड, सत्यनारायण कांबळे आदींची निवड करण्यात आली यावेळी सभापती जगदीश पाटील भोसीकर,किशोर पाटील लगळूदकर, उपसभापती बालाजी शानमवाड, संचालक रामचंद्र मुसळे,उज्वल केसराळे, दिलीपराव सोमठाणकर, राजेश अंगरवार, आदींची उपस्थिती होती नूतन कार्यकारिणीचे पुष्पहार घालून स्वागत करण्यात आले.