तभा फ्लॅश न्यूज/टेंभुर्णी : माढा तालुक्यातील येथे सासरकडून सातत्याने होत असलेल्या शारीरिक व मानसिक छळाला कंटाळून एका विवाहितेने गळफास घेऊन आत्महत्या केली. परिसरात एकच खळबळ उडाली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सुरुवातीला संसार व्यवस्थित सुरू होता. मात्र नवरा, सासू व सासऱ्यांनी “काम नीट करत नाहीस, माहेरहून सात लाख रुपये घेऊन ये ट्रॅक्टर खरेदी करायचा आहे” अशा कारणांवरून सतत छळ सुरू केला. पैशासाठी वारंवार मारहाण, मानसिक छळ करण्यात येत होता. परिस्थिती गरीब असल्याने माहेरहून पैसे देणे शक्य नव्हते.
पीडितेला माहेरी आणून तिने कोर्टात तक्रारही दाखल केली होती. त्यानंतर सासरच्या लोकांनी पुन्हा त्रास देणार नसल्याचे लेखी आश्वासन देत तिला परत नेले. परंतु छळ थांबला नाही. अगदी काही दिवसांपूर्वीही पैशासाठी मारहाणीची घटना घडली होती.
या घटनेमुळे संपूर्ण परिसरात संतापाची लाट उसळली असून, पोलिसांनी पती, सासू व सासऱ्यावर गुन्हा दाखल केला आहे.