तभा फ्लॅश न्यूज/माहूर : तालुक्यातील कुपटी शेत शिवारातील ओढ्या जवळ अवैधरित्या गावठी दारू तयार करणाऱ्या हातभट्टी अड्ड्यावर माहूर पोलिसांनी मासरेड कारवाई दरम्यान छापा टाकला.या कारवाईमध्ये दारू तयार करण्यासाठी लागणारे ६०० लिटर मोहफूल सडवा रसायन व १०० लिटर तयार हातभटीची दारू असा एकूण ४० हजार रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करून एका विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
माहूरचे पोलिस निरीक्षक गणेश कराड यांनी आज दिनांक १९ जुलै रोजी तक्रारदार खंडाळे यांच्या तक्रारीवरून सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप अन्येबोईनवाड,पोलिस जमादार गजानन चौधरी, संग्राम पवार,पवन राऊत, नागरगोजे यांना सोबत घेऊन माहूर पोलीस स्टेशन हद्दीमधील कुपटी शिवारातील एका ओढ्याजवळ सकाळी १० च्यासुमारास मासरेड कारवाई दरम्यान छापा टाकला असता त्या ठिकाणी अंदाजे ६०० लिटर मोह फुल सडवा रसायन व १०० लिटर तयार हातभट्टीची दारू असा एकूण ४० हजार रुपयांचा मुद्देमाल पोलिसांना मिळून आला.
या प्रकरणी रामभाऊ देवराव अंभोरे वय ४५ रा. कुपटी याच्याविरुद्ध माहूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास जमादार गजानन चौधरी हे करीत आहेत.