Monday, February 2, 2026
dainiktarunbharat.com
Solapur Tarun Bharat
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
No Result
View All Result
dainiktarunbharat.com
No Result
View All Result

आरोग्य खात्यात प्रचंड भ्रष्टाचार, माझ्याकडे पुरावे, जबाबदार व्यक्तीचे नाव कळवा, त्याच्याकडे पुरावे देतो : राऊत

वार्ताहर, तरुण भारत, सोलापूरbyवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
December 6, 2023
in maharashtra
0
आरोग्य खात्यात प्रचंड भ्रष्टाचार, माझ्याकडे पुरावे, जबाबदार व्यक्तीचे नाव कळवा, त्याच्याकडे पुरावे देतो : राऊत
0
SHARES
60
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

माझ्या समोर आरोग्य खात्यातील भ्रष्टाचाराची, अनियमिततेची प्रकरणे पुराव्यासह आली आहेत व हा सगळाच प्रकार गंभीर तसेच राज्याच्या प्रतिष्ठेला काळिमा फासणारा आहे, याकडे संजय राऊत यांनी मुख्यमंत्र्यांचे लक्ष वेधले आहे.

 

 

राज्यातील आरोग्य व्यवस्था व आरोग्य यंत्रणेबाबत कमालीचे गोंधळाचे चित्र निर्माण झाले आहे. जनतेच्या जीवनमरणाशी संबंधित हा अत्यंत संवेदनशील विभाग आहे, पण अलीकडे आरोग्य मंत्रालय हे भ्रष्टाचाराचे कुरण, अनियमित बदल्या-बढत्यांचा व त्यातून आर्थिक उलाढालीचा विभाग बनला आहे. या विभागात फक्त पैसाच बोलतो व पैसाच काम करतो असे बोलले जाते, असा गंभीर आरोप करणारं पत्र शिवसेना ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना हिवाळी अधिवेशनाच्या पूर्वी लिहिलं आहे. त्यामुळे उद्यापासून सुरू होणाऱ्या अधिवेशनात आरोग्य मंत्रालयाच्या कथित भ्रष्टाचारावरून ठाकरे गटाचे आमदार आक्रमक होण्याची शक्यता आहे.

 

 

आरोग्य विभागाच्या संपूर्ण खात्यात असंतोष आहे व त्याचा फटका गरीबांना बसत आहे. ड्रग्ज माफिया ललित पाटील प्रकरण हे सरळ सरळ आरोग्य विभागाशी संबंधित आहे. पोलिसांइतकेच संबंधित खात्याचे मंत्री व अधिकारीही त्यास जबाबदार आहेत. माझ्या समोर आरोग्य खात्यातील भ्रष्टाचाराची, अनियमिततेची प्रकरणे पुराव्यासह आली आहेत व हा सगळाच प्रकार गंभीर तसेच राज्याच्या प्रतिष्ठेला काळिमा फासणारा आहे. नियमबाह्य बढत्या व बदल्या हा एक मोठा उद्योग आरोग्य विभागात बनला असून या उद्योगाचे ‘संचालक’ संबंधित खात्याचे मंत्री तानाजी सावंत असल्याचे स्पष्टपणे दिसत आहे, असा आरोप संजय राऊत यांनी केलाय.

 

 

आरोग्य खात्यातील भ्रष्टाचाराबाबत माझ्याकडे भक्कम पुरावे आहेत. आपल्या कार्यालयातील जबाबदार व्यक्तीचे नाव कळवा. त्याच्या हाती पुरावे सुपूर्द करण्यास मला आनंदच होईल. आरोग्य खात्यातीत भ्रष्टाचाराची सखोल चौकशी व्हावी, अशी मागणी संजय राऊत यांनी पत्रातून केली आहे.

 

 

संजय राऊत यांच्याकडून आरोपांची मालिका

  • महाराष्ट्रातील एकूण १२०० वैद्यकीय अधिकाऱ्यांचे ‘समावेशन’ करण्यासाठी प्रत्येकी ४ लाख असे एकूण साधारण ५० कोटी रुपये जमा केले व हे संबंधित खात्याच्या मंत्र्यांपर्यंत पोहोचविण्यात आले. त्या वसुलीसाठी एका खास ओएसडीची नियुक्ती करण्यात आली.

 

  • अत्यंत गंभीर बाब अशी की, सध्या महात्मा ज्योतीराव फुले योजना लागू करण्यासाठी खासगी रुग्णालयांकडून प्रति बेड १ लाख रुपये घेतले जातात. याचा अर्थ या योजनेत बोगस लाभार्थीची भरमसाठ खोटी बिले, खोटे रुग्ण यावर कोट्यवधी रुपये संबंधित मंत्र्यांना पोहोचवले जात आहेत.

 

  • आरोग्य खाते जनतेसाठी अत्यंत महत्वाचे आहे. या खात्याची दोन्ही संचालकपदे रिक्त ठेवली असून त्याचा लिलाव पद्धतीने सौदा करण्याची मंत्री महोदयांची योजना आहे.
  • भ्रष्टाचार व सावळा गोंधळ यामुळे आरोग्य खाते पूर्णपणे सडले आहे. २४ पैकी १२ कनिष्ठ अधिकाऱ्यांना बेकायदेशीरपणे सिव्हिल सर्जन नियुक्तीपदी नियुक्ती दिली. यात मोठ्या प्रमाणात आर्थिक व्यवहार झाला आहे.

 

  • वाशिम आणि बुलडाणा जिल्ह्यांत ‘सीएस’ केडर नसलेल्या दोघांना सर्जन नियुक्तीपदी नियुक्ती दिली. यामागे अर्थकारणाचा आकडा मुडद्यांनाही धक्का देणारा आहे.

 

  • महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत १४ उपसंचालकांची निवड झाली, पण त्यांच्याकडे ‘नियुक्तीसाठी प्रत्येकी ५० लाखांची मागणी केली. ही मागणी पूर्ण न झाल्याने यांना एकजात साईड पोस्टिंग मुंबई-पुण्यात दिल्या, ज्यांच्याकडे पोस्टिंगसाठी पैशांची मागणी आजही सुरु आहे.

 

  • नाशिक, लातूर येथे राज्य लोकसेवा आयोगाचे उपसंचालक असताना ५०-५० लाख रुपये घेउन कनिष्ठ अधिकाऱ्यांना पदे दिली. छत्रपती संभाजीनगर, अकोला येथील पदे रिक्त ठेवली. एमपीएससीचे संचालक असतानाही ही पदे रिक्त ठेवण्यामागे पैशांची लालसा हेच कारण आहे.

 

  • डॉ. प्रतापसिंह सारणीकर हे जिल्हा आरोग्य अधिकारी या यादीत १११ क्रमांकावर आहेत. उपसंचालक यादीत त्यांचे नाव नाही तरी त्यांना दोन टप्पे ओलांडून सहसंचालकपदी नियुक्ती करणे हे धक्कादायक तसेच यामागे अर्थकारण आहे याचा पुरावा आहे.
  • आरोग्य खात्यातील भ्रष्टाचार कोणत्या थराला गेलाय याचे उत्तम उदाहरण म्हणून जळगाव प्रकरणाकडे पाहता येईल. २०२० च्या ‘कोविड’ खरेदीत अनियमितता आहे म्हणून डॉ. नागोराव चव्हाण (जिल्हा शल्यचिकित्सक जळगाव) यांना निलंबित करण्यात आले, परंतु त्याच खरेदी व्यवहारातील १८ कोटी रुपये संबंधित ठेकेदार कंपनीस वितरित करण्यासाठी मंत्र्यांकडून दबाव आला व ३ वर्षांनंतर त्यास आता प्रशासकीय मान्यता देण्यात आली. या व्यवहारातील ८ कोटी रुपये कात्रज मुक्कामी पोहोचवण्यात आले.

 

  • गेल्या वर्षभरात आरोग्य खात्यात भ्रष्टाचाराच्या सर्व मर्यादा पार केल्या. पैशांची मागणी करण्यात्साठी व पैसे जमा करून घेण्यासाठी एका उपसंचालक पदाच्या अधिकाऱ्याची खास नियुक्ती केली असून सर्व पैसे संबंधित मंत्रीमहोदयांच्या कात्रज येथील खासगी शिक्षण संस्थेच्या कार्यालयात जमा केले जातात.

 

  • आरोग्य खात्यातील भ्रष्टाचाराची चौकशी व्हावी, खासकरून महात्मा ज्योतीराव फुले योजनेतील बेकायदेशीर कामांची चौकशी व्हावी. याबाबत गृहमंत्रालयानेही निर्देश दिल्याची माझी माहिती आहे.

 

  • मा. मुख्यमंत्री महोदय, आरोग्य खात्यातील भ्रष्टाचाराबाबत माझ्याकडे भक्कम पुरावे आहेत. आपल्या कार्यालयातील जबाबदार व्यक्तीचे नाव कळवा. त्याच्या हाती पुरावे सुपूर्द करण्यास मला आनंदच होईल. आरोग्य खात्यातीत भ्रष्टाचाराची सखोल चौकशी व्हावी. गृहमंत्र्यांनी याबाबत चौकशीचे निर्देश दिलेच आहेत. त्या चौकशीला गती मिळावी व राज्याची आरोग्य यंत्रणा भ्रष्टाचारमुक्त करण्यासाठी संबंधित मंत्री व अधिकान्यांचे पोस्टमार्टेम व्हावे ही विनंती.
Post Views: 77
Previous Post

संजय राऊतांना काही बोलाल तर जशासं तसं उत्तर देऊ | शरद कोळी

Next Post

शिवराजसिंह चौहान म्हणाले, ‘मी मुख्यमंत्रिपदाच्या शर्यतीत यापूर्वी नव्हतो आणि…,’ भाजप कुणाला संधी देणार?

वार्ताहर, तरुण भारत, सोलापूर

वार्ताहर, तरुण भारत, सोलापूर

Next Post
शिवराजसिंह चौहान म्हणाले, ‘मी मुख्यमंत्रिपदाच्या शर्यतीत यापूर्वी नव्हतो आणि…,’ भाजप कुणाला संधी देणार?

शिवराजसिंह चौहान म्हणाले, ‘मी मुख्यमंत्रिपदाच्या शर्यतीत यापूर्वी नव्हतो आणि...,’ भाजप कुणाला संधी देणार?

ताज्या बातम्या

बुद्धिबळ स्पर्धेत जि.प.प्रा.शाळा सावरकर नगर इस्लामपूर येथील प्रथम मुलींनी क्रमांक पटकावला.#public

February 2, 2026

मंठा येथील सर्वपक्षीय शोकसभेत दादांच्या आठवणीत सर्वच गहिवरले#public #maharashtranews #aajsolapur

February 2, 2026

36 वर्षाची ज्ञान सेवा पूर्ण पारध चे आदर्श शिक्षक रवी लोखंडे सेवानिवृत्त.#public #maharashtranews

February 2, 2026

भडगाव के टी सी ट्रक ची मालवाडा दुचाकीला धडक दुचाकी स्वार दुर्गा भावंडांचे पाय फ्रॅक्चर #viral #news

February 2, 2026

शिवसेनेचे प्रियदर्शन साठे यांनी भरला महापौर पदाचा अर्ज..#public #maharashtranews #aajsolapur #viral

February 2, 2026

सुप्रसिद्ध सर्पमित्र आकाश जाधव याचा काळा धंदा उघडकीस आला. #viral #public #news #popular #youtube

February 2, 2026

उपमुख्यमंत्री अजित पवार यांची अस्थिकलश सोलापुरात#public #trending #maharashtranews #aajsolapur

February 2, 2026

ऐतिहासिक निर्णय डॉल्बीच्या कर्कश आवाजाला फाटा.#viral #news #maharashtranews #public #aajsolapur

February 2, 2026

फेसबुक पेज

मनोरंजन

‘लास्ट स्टॉप खांदा’ चित्रपटाचा दमदार ट्रेलर लाँच ; २१ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला

byतरुण भारत
November 12, 2025
0

सोलापूर - सध्या जोरदार चर्चेत असलेल्या 'लास्ट स्टॉप खांदा...' या चित्रपटातून प्रेमाचा इमोशनल, कॉमेडी ड्रामा उलगडणार आहे.उत्तम लेखन,अभिनय,संगीत असलेला,पुरेपूर मनोरंजन...

दिल्लीसह 26 राज्यांमध्ये अतिवृष्टीचा इशारा

राज्यभरात पुढील चार दिवस अतिवृष्टीचा इशारा!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 16, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ मुंबई :  राज्यात गेल्या दोन दिवसापासून सुरू असलेली पावसाची संततधार  पुढील चार दिवस कायम रहाणार आहे. २१...

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 11, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ तामसा : तामसा येथे जागतिक आदिवासी दिनाच्या औचित्याने आदिवासी समाजाकडून आदिवासी संस्कृतीचे दर्शन घडविण्यात आले. येथील नवीन...

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  प्रायोगिक रंगभूमीला भक्कम आणि सशक्त बनवण्यासाठी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेने 'प्रायोगिक रंगमंच संघ' मुंबई या संस्थेला...

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज : वाद निर्माण होतील असे चित्रपट बनवायचे म्हणजे त्याविषयी समाजात मोठ्या प्रमाणात चर्चा होते, त्याचा निषेध केला...

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 29, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत ग्रामीण विकास, महिला सुरक्षा, शेती बाजारपेठ, जलसंपदा आणि...

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 23, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/श्याम ठाणेदार : मराठी चित्रपट आणि नाट्य सृष्टीतील जेष्ठ अभिनेते जयंत सावरकर यांचा दुसरा स्मृतिदिन. बरोबर एक वर्षापूर्वी...

Load More

राजकीय

सोलापूर महापालिकेत भाजपाची सत्ता स्थापनेची तयारी अंतिम टप्प्यात; ८७ नगरसेवक गट नोंदणीसाठी पुण्याकडे रवाना

byतरुण भारत
February 1, 2026
0

सोलापूर -  महानगरपालिका निवडणुकीत भारतीय जनता पार्टीने ऐतिहासिक आणि भरघोस यश मिळवत स्पष्ट बहुमताची मजल मारली आहे. या विजयामुळे महापालिकेत...

शिवसेना गटनेतेपदी अमोल शिंदे यांची निवड

byतरुण भारत
January 29, 2026
0

सोलापूर : महानगरपालिकेतील राजकीय हालचालींना वेग आला असून, शिवसेनेच्या (शिंदे गट) गटनेतेपदी अमोल बाळासाहेब शिंदे यांची निवड करण्यात आली आहे....

वापरा आणि फेका हे भाजपचे धोरण; भाजप हा कूटनीती, षडयंत्र, कारस्थान करणारा पक्ष –  सुषमा अंधारे 

byतरुण भारत
January 26, 2026
0

सोलापूर : भारतीय जनता पक्ष हा धुतल्या तांदळासारखा, सत्शील पक्ष नसून कूटनीती, षडयंत्र, कपटनीती, कारस्थान करणारा पक्ष आहे.वापरा आणि फेका...

दक्षिणमध्ये काॅंग्रेसला धक्का : युवक काॅंग्रेस तालुका कार्याध्यक्ष सचिन व्हनमाने यांनी दिला राजीनामा

byतरुण भारत
January 23, 2026
0

सोलापूर - ऐन निवडणूकीच्या तोंडावर युवक काॅंग्रेसचे तालुका कार्याध्यक्ष सचिन व्हनमाने यांनी पक्षातील वरिष्ठांच्या त्रासाला कंटाळून राजीनामा दिला आहे. लवकरच...

Load More

आमच्याबद्दल

dainiktarunbharat.com

“सोलापूर तरुण भारत” हे नाव सोलापूर, धाराशिव, लातूर, नांदेड, जालना, बीदर, गुलबर्गा, संभाजीनगर (औरंगाबाद ), सातारा, सांगली, कोल्हापूर या जिल्ह्यात सर्वांच्या परिचयाचे आहे. वाचकांच्या प्रेमाचे आणि ‘तरुण भारत’ने सांभाळलेल्या मूल्यांचेच हे यश आहे.
यशाला शेवटचा असा टप्पा नसतो. त्यामुळेच आता प्रत्येकाच्या हातातील स्मार्ट फोनवर, टेबलवरील कॉम्प्युटर स्क्रीनवर ‘तरुण भारत’ वाचता येईल. जगभरातील वाचकांना ‘तरुण भारत’ वेब आवृत्तीच्या स्वरुपात नव्या तंत्रज्ञानाच्या सहाय्याने उपलब्ध होत आहे.

Subscribe Our Youtube Channel

वेबसाईट दर्शक

0653815

वृत्त संग्रह

February 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
232425262728  
« Jan    
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy
  • Cancellation / Refund policy
  • Shipping Policy
  • Terms and Conditions

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories

© Website Design by Digital Buffalo - 9028927697