तभा फ्लॅश न्यूज/मुखेड : लातूर जिल्ह्यातील उदगीर तसेच कर्नाटक सीमा भागात झालेल्या ढगफुटीमुळे लेंडी नदीला आलेल्या महापुराचे पाणी तब्बल सहा गावात शिरले. यात मोठ्या प्रमाणात वित्तहानी झाली असून आतापर्यंत पाच जणांचा मृत्यू झाल्याचे समोर आले आहे.
दि. 18 ऑगस्ट रोजी ३५४.८ मि.मी. तर मूक्रमाबाद येथे 206.8 मि.मी. असा विक्रमी पाऊस झाला. लेंडी प्रकल्पाच्या पाणलोट क्षेत्रात ढगफुटी झाल्याने 6 गावे पाण्याखाली गेली.
पूरात सुमारे 300 नागरिक अडकले होते,मात्र राज्य आपत्ती निवारण दलाने त्यांना सुरक्षित बाहेर काढले. तरीही हसनाळ येथे बेपत्ता झालेल्या पाच नागरिकांपैकी 5 मृतदेह सापडले. घटनास्थळी भारतीय लष्कराचे जवान व वैद्यकीय पथक युद्धपातळीवर बचाव कार्यात गुंतले आहेत.
गावकऱ्यांचा संताप : लेंडी प्रकल्प अभियंता यांच्यावर कारवाईची मागणी
लेंडी प्रकल्प बाधित गावकऱ्यांनी अभियंता तिडके यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. पुनर्वसनाचे काम पूर्ण झाले नसतानाही त्यांनी घळभरणीची घाई केली गाव पाण्याखाली जाणार नसल्याचे आश्वासन देऊनही संपूर्ण गावे पाण्यात गेल्याने गावकऱ्यांनी फसवणूक झाल्याचा आरोपकेला आहे. त्यांनी संबंधितांवर कडक कारवाई करण्याची मागणी केली आहे.