हदगाव / नांदेड – मुख्यमंत्री समृद्ध ग्रामपंचायत अभियानांतर्गत ग्रामपंचायत येवली तालुका हदगाव येथे दि.८.१२.२०२५ रोजी आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिरास नांदेड येथील रेणुकाई मल्टीस्पेशालिस्ट हॉस्पिटल नांदेड, भगवती मल्टीस्पेशालिस्ट हॉस्पिटल, ,सहयोग मल्टीस्पेशलिस्ट हॉस्पिटल, नांदेड क्रिटिकल केअर हॉस्पिटल, क्षितिज मल्टी स्पेशालिस्ट हॉस्पिटल, अपेक्षा मल्टी स्पेशालिस्ट हॉस्पिटल नांदेड यांनी येवली तालुका हदगाव येथे आरोग्य शिबिराचे कॅम्प आयोजित केला होता एवढ्या मोठ्या प्रमाणात पहिल्यांदाच ग्रामीण भागात आरोग्य शिबिराचे आयोजन झाल्यामुळे येवली परिसरातील आंदवाडी ,येवली तांडा ,कोका तांडा, आष्टी ,उमरी, वायपना, पिंपळगाव ,राजवाडी ,घोगरी या गावातील गरजू लोकांनी या शिबिरामध्ये येऊन उपचार घेतल्यामुळे तसेच गंभीर आजार असलेल्या लोकांना नांदेड येथे पुढील शस्त्रक्रिया व ऑपरेशन करण्यात येणार आहेत त्यामुळे गरीब व गरजू लोकांना या शिबिराचा लाभ झाल्यामुळे त्यांच्या चेहऱ्यावर आनंदाचे भाव दिसू लागले.
या कार्यक्रमा साठी ग्रामपंचायत येवली यांनी जनजागृती करून चांगल्या पद्धतीने आयोजन केल्यामुळे आलेल्या लोकांचे व्यवस्थित नियोजन केल्यामुळे या शिबिरामध्ये जवळपास ५०० रुग्णांना तपासण्यात आले आहे. अशाप्रकारे नियोजन केल्यामुळे येणाऱ्या रुग्णांनी व डॉक्टर च्या चमूने सरपंच कंठाळे यांचे आभार मानले.
अशाप्रकारे हे आरोग्य शिबिर यशस्वी करण्यासाठी गजानन कंठाळे, उपसरपंच सोनटक्के, दत्ता कवळे, नितीन साखरे, तंटामुक्ती अध्यक्ष गंगाधर महाराज , ग्रामपंचायत सदस्य मुकिंदा नरवाडे , मारुतरावजी सातलवाड, बालाजी तमलवाड,ऑपरेटर बालाजी पांडे, पाणीपुरवठा कर्मचारी यलकधरे, ग्रामपंचायत सेवक पंडित, या सर्वांनी कार्यक्रम यशस्वी साठी परिश्रम घेऊन कार्यक्रम यशस्वी केला.






















