सोलापूर : २० वर्षे संघर्ष करून शासनाला शिक्षकेतर कर्मचारी भरतीचा अध्यादेश काढण्यात आले तरी अद्याप भरती प्रक्रिया सुरू झाली नाही. त्यामुळे बदलापूर सारख्या घटना घडत आहेत. म्हणून शासनाने तात्काळ शिक्षकेतर कर्मचारी भरती प्रक्रिया सुरू करावी.चतुर्थश्रेणी कर्मचाऱ्यांचे २४ वर्षानंतरच्या लाभाच्या अनुषंगाने पूर्वीप्रमाणे S5 मध्येच वेतन निश्चिती करण्यात यावी. नवीन सुधारित आश्वासित प्रगती योजनाबाबत निर्णय घ्यावा. शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना कर्मचाऱ्यांना विनाअट वेतनश्रेणीत पदोन्नती मिळावी, शिक्षकेतर कर्मचारी अतिरिक्त झाल्यानंतर त्यांच्या पदात वेतनश्रेणीत कोणताही बदल करू नये या मागण्यांसाठी महाराष्ट्र राज्य माध्यमिक शाळा शिक्षकेतर संघटना महामंडळातर्फे सोमवारी पुण्यात शनिवार वाडा ते शिक्षण आयुक्त कार्यालय दरम्यान विराट मोर्चा काढण्यात आला. शिक्षकेतर कर्मचारी संघटनेचे नेते शिवाजी खांडेकर यांच्या नेतृत्वाखाली राज्यातील विविध जिल्ह्यातील कर्मचाऱ्यांनी हजारोंच्या संख्येने या मोर्चात उत्स्फूर्तपणे सहभाग घेतला.
यावेळी शिक्षक आमदार जयंत आसगावकर , संघटनेचे अध्यक्ष अनिल माने, कार्याध्यक्ष मोरेश्वर वासेकर, विना अनुदानित कृती समितीचे खांडेराव जगदाळे, मुख्याध्यापक संघटनेचे हरिषचंद्र गायकवाड, शिक्षक लोकशाही आघाडीचे शिवाजी कामाथे यांच्यासह शिक्षक व शिक्षकेतर संघटनेचे पदाधिकारी मोठ्या संख्येने या मोर्चात सहभागी झाले. या आंधोलनात सात ते आठ हजार शिक्षकेतर कर्मचारी सहभागी झाले होते. सोलापूर जिल्हा शिक्षकेतर संघटनेचे सचिव मुस्ताक शेतसंदी , अध्यक्ष रवी सुर्वे , षडाक्षरी स्वामी , स्नेहराज चव्हाण , सचिन कोक्कळगी, सुरेश कोळी, सुधाकर व्हनकोरे आदी सोलापूर जिल्ह्यातील शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते.



















