बार्शी – महाराष्ट्र राज्य गणित अध्यापक मंडळामार्फत इयत्ता ५ वी व ८ वी मधील विद्यार्थ्यांसाठी घेतली जाणारी गणित प्राविण्य परीक्षा सुलाखे हायस्कूल बार्शी या केंद्रावर उत्साहात पार पडली.
इयत्ता पाचवी व आठवीचे एकूण २७० विद्यार्थी तालुक्यातून प्राविण्य परीक्षेसाठी उपस्थित होते . सदर परीक्षा केंद्रास परीक्षा सुरु असताना बार्शी तालुका गणित अध्यापक मंडळाचे अध्यक्ष शंकर आगलावे, उपाध्यक्ष संदेश घाडगे, सचिव सचिन झाडबुके, सहसचिव जैनुद्दीन शेख, राजू शेख, विकास सुतार, पवार मॅडम तसेच सोलापूर जिल्हा गणित मंडळाचे उपाध्यक्ष संतोष साळुंखे यांनी सदिच्छा भेट दिली .
ही परीक्षा पार पाडण्यासाठी परीक्षा प्रमुख म्हणून सूर्यकांत चोरमले यांनी व्यवस्थित नियोजन केले. प्राविण्य परीक्षा केंद्रासाठी हायस्कूलचे प्राचार्य स्वामीराव हिरोळीकर यांचे सहकार्य लाभले. सदर परीक्षा यशस्वी करण्यासाठी सर्व बार्शी तालुका गणित मंडळ सदस्यांनी परिश्रम घेतले.

















