निवघा (बा) तरूण पिढी व्यसनाच्या आहारी मटक्यामुळे अनेकांचे संसार उघड्यावर
निवघा बाजार परिसरात तालुक्यात मोठ्या प्रमाणात अवैध धंदे फोफावले आहेत. यामध्ये तरूण पिढी व्यसनाधिन बनत चालली असून अवैध मटका जुगार अड्चावर तरूणांचा गराडा दिसून येत आहे. याकडे पोलिसांचा कानाडोळा होत असल्याने भांडण तंट्यातही वाढ होताना दिसून येते. शिवाय अवैध धंद्यामुळे अनेकांचे संसार उघड्यावर आले आहेत. निवघा परिसरात अवैध धंदे बंद करण्याची मागणी होत आहे.
जनतेत उलटसुलट ऊत आला आहे.
चर्चेला शहरात ठिकठिकाणी मटक्याचे सार्वजनिक ठिकाणी खुलेआम मटक्या चे स्टॉल थाटण्यात आले आहेत हॉटेलमध्ये खुलेआम मटका घेणे चालू आहे. तसेच निवघा बाजार परिसरात व सर्कलमध्ये मोठ्या प्रमाणात मटका सुरू आहे.
डोळ्यात धुळ फेकीत निवघा परिसरात व सर्कलमध्ये मोठ्या प्रमाणात मटका खुलेआम पद्धतीने सुरू असून या प्रकरणी वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांनी त्वरीत लक्ष देऊन चालु असलेले मोबाईल दु मोबाईल मटका, बंद करण्याची मागणी जनतेतून मोठ्या प्रमाणात केली जात आहे…..