अक्कलकोट – मावा विक्री करणाऱ्या पान टपऱ्या चालक व दुकानदारांवर आजपासून तत्काळ गुन्हे दाखल करण्यात येणार असून पोलिस निरीक्षक दीपक भिताडे आणि मुख्याधिकारी रमाकांत डाके यांच्या संयुक्त विद्यमाने एक समिती कायमस्वरूपी कार्यरत ठेवण्याचे आदेश नगराध्यक्ष मिलन कल्याणशेट्टी यांनी दिली आहे.
आज पासून अक्कलकोट मध्ये मावा विक्री करणाऱ्यावर गुन्हे दाखल करण्यात येणार असल्याने मावा शहरातून हद्दपार होणार आहे. यासाठी आरोग्य समिती सभापती अविनाश मडीखांबे आणि नगरसेवक तम्मा मामा शेळके यांनी पुढाकार घेतला आहे. या कामास नगरपरिषदेचे मुख्याधिकारी रमाकांत डाके यांचे सहकार्य मिळत आहे. अक्कलकोट मध्ये जे कोणी मावा विक्री करतील त्यांच्यावर आणि मावा विक्री करणाऱ्या पान टपऱ्या चालक व दुकानदारांवर गुन्हे दाखल करण्यात येणार आहेत.
अक्कलकोट शहरातील चांगले रस्ते मावा खाऊन थुंकल्यामुळे रंगीत आणि अस्वच्छ होत आहेत. ही अस्वच्छता बघून नागरिकांना किळस येऊन उलट्या होण्याची वेळ आली आहे. याची गंभीर दखल अक्कलकोट नगरपरिषदे चे नुतन सभापती अविनाश मडीखांबे आणि नगरसेवक भिमराव उर्फ तम्मा मामा शेळके यांनी पुढाकार घेतली आहे. अक्कलकोट शहरातील जागोजागी मोठ्या प्रमाणात होणारी मावा विक्री त्वरीत बंद करण्यात यावी आणि जे कोणी मावा विक्री करतील त्यांच्यावर गुन्हे दाखल करण्यात यावेत अशी मागणी या दोघांनी आज अक्कलकोट नगर परिषद चे मुख्याधिकारी रमाकांत डाके यांच्या कडे केली आहे. या मागणीची दखल घेत नगराध्यक्ष मिलन कल्याणशेट्टी यांनी पोलिस निरीक्षक दीपक भिताडे आणि मुख्याधिकारी रमाकांत डाके यांच्या संयुक्त विद्यमाने एक समिती गठित करण्याचे आदेश दिले आहे. या आदेशानुसार अक्कलकोट शहरातील जागोजागी विक्री होणारी मावा विक्री ची दुकाने टपऱ्या तात्काळ बंद करण्यात येणार आहे.या आदेशाची पालन न करणाऱ्यावर तात्काळ गुन्हे दाखल करण्यात येणार आहे. यामुळे अक्कलकोट शहरातील अवैधपणाने विक्री केला जाणारा मावा आता हद्दपार होणार आहे. आरोग्यास घातक असलेल्या मावा ची अनेक दुकाने पान टपऱ्या अक्कलकोट येथे मोठ्या प्रमाणात असून या पान टपऱ्या समोर मोठ्या प्रमाणात मावा खाऊन रस्त्यावर थुंकले जात आहे. यामुळे सर्वसामान्य नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले असून रस्त्यावर अस्वच्छता निर्माण झाली आहे. आरोग्य समितीचे सभापती अविनाश मडीखांबे यांनी आपल्या पदाची सुत्रे हाती घेतल्या नंतर त्यांनी अक्कलकोट मधील स्वच्छतेला प्राधान्य दिले आहे.
या निर्णयाचे स्वागत नगराध्यक्ष मिलन कल्याणशेट्टी , मुख्याधिकारी रमाकांत ढाके ,पोलीस निरीक्षक दीपक भिताडे आणि पर्यावरणवादी सर्व नागरिकांनी स्वागत केले असून हा उपक्रम यशस्वी करण्यासाठी नागरिकांचा पाठिंबा मिळत असून अक्कलकोट शहरात आणि नगरपरिषद च्या मालकीच्या शॉपिंग सेंटर च्या समोर आणि जागोजागी तसेच अयोध्या शॉपिंग सेंटर एस टी बस स्थानकासमोर मोठ्या प्रमाणात पान टपऱ्या मध्ये आणि तेथील हॉटेल्स समोर मावा खाऊन रस्त्यावर थुंकले जात आहे. त्यामुळे अशी घाण बंद होणे गरजेचे आहे.
– अविनाश मडीखांबे आरोग्य समिती सभापती, न प अक्कलकोट

























