Wednesday, March 25, 2026
dainiktarunbharat.com
Solapur Tarun Bharat
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
No Result
View All Result
dainiktarunbharat.com
No Result
View All Result

महापौर – उपमहापौर निवडीपूर्वी भाजपाची रणनिती ठरली ठोस

Makrand Dhobalebyतरुण भारत
February 6, 2026
in political
0
0
SHARES
6
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

सोलापूर –  महानगरपालिकेच्या महापौर व उपमहापौर निवडणुकीसाठी शुक्रवार, दिनांक ६ फेब्रुवारी रोजी विशेष सर्वसाधारण सभा आयोजित करण्यात आली आहे. ही निवडणूक सकाळी ११ वाजता पार पडणार असून, त्या अनुषंगाने भारतीय जनता पार्टीकडून सर्व नगरसेवकांसाठी महत्त्वाच्या सूचना देण्यात आल्या आहेत. भाजपाच्या सर्व नगरसेवकांनी शुक्रवारी सकाळी १० वाजता महापालिकेतील पक्षनेता कार्यालयात उपस्थित राहणे अनिवार्य असल्याचे आवाहन शहराध्यक्षा रोहिणी तडवळकर यांनी केले आहे.

      या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपाच्या वतीने नवनिर्वाचित ८७ नगरसेवकांची महत्त्वपूर्ण बैठक सोलापूर येथील सारस्वत ब्राह्मण समाज मंगल कार्यालयात पार पडली. या बैठकीस शहराध्यक्षा रोहिणी तडवळकर, गटनेते नरेंद्र काळे, महापौर पदाचे उमेदवार विनायक कोंड्याल, उपमहापौर पदाच्या उमेदवार ज्ञानेश्वरी देवकर, सरचिटणीस नारायण बनसोडे, महिला मोर्चा अध्यक्षा रंजीता चाकोते, सरचिटणीस सुधा अळीमोरे यांच्यासह शहरातील सर्व प्रमुख पदाधिकारी व नगरसेवक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

बैठकीदरम्यान गटनेते नरेंद्र काळे यांनी उपस्थित नगरसेवकांना सभागृहातील शिस्त, पक्षाची भूमिका आणि मतदान प्रक्रियेबाबत महत्त्वाच्या सूचना दिल्या. यानंतर शहराध्यक्षा रोहिणी तडवळकर यांनी आपले मनोगत व्यक्त करताना सांगितले की, सभागृहात जाण्यापूर्वी पक्षनेता कार्यालयात सर्व नगरसेवकांना कामकाजाची सविस्तर माहिती देण्यात येणार आहे. त्यामुळे कोणताही गैरसमज होऊ नये व पक्षाची एकजूट कायम राहावी यासाठी सर्वांनी वेळेवर उपस्थित राहणे आवश्यक आहे.

या बैठकीत भाजपाकडून अधिकृतपणे सर्व नगरसेवकांना व्हीपही बजावण्यात आला. आगामी महापौर व उपमहापौर निवडणुकीत भाजपाचा विजय निश्चित करण्यासाठी पक्ष संघटनेने कंबर कसल्याचे या बैठकीतून स्पष्ट झाले.

Post Views: 42
Previous Post

प्रा. डॉ. राहुल पालके लिखित कर्मवीर प्रेरणा पुस्तकाचे समाजदिनी प्रकाशन

Next Post

घरफोडीचे १० गुन्हे उघडकीस, सराफ कारागिरास अटक

Makrand Dhobale

तरुण भारत

Next Post

घरफोडीचे १० गुन्हे उघडकीस, सराफ कारागिरास अटक

ताज्या बातम्या

दिव्यांग शिबिरात तब्बल २०४ दिव्यांगांना मॉड्युलर हात आणि पाय मोफत बसविले

दिव्यांग शिबिरात तब्बल २०४ दिव्यांगांना मॉड्युलर हात आणि पाय मोफत बसविले

March 25, 2026
शिक्षक पात्रता परीक्षेबाबत शासन लवकरच पुनर्विचार याचिका दाखल करणार : राज्यमंत्री पंकज भोयर

शिक्षक पात्रता परीक्षेबाबत शासन लवकरच पुनर्विचार याचिका दाखल करणार : राज्यमंत्री पंकज भोयर

March 25, 2026
ग्रामपंचायतीकडून ५ टक्के दिव्यांग निधीचे वाटप; १८ लाभार्थ्यांना ११ हजारांचा निर्वाह भत्ता

ग्रामपंचायतीकडून ५ टक्के दिव्यांग निधीचे वाटप; १८ लाभार्थ्यांना ११ हजारांचा निर्वाह भत्ता

March 25, 2026
पिलीव येथील रक्तदान शिबीरात 163 जणांचे रक्तदान

पिलीव येथील रक्तदान शिबीरात 163 जणांचे रक्तदान

March 25, 2026
विद्यार्थ्यांनी अनुभवली जिवाची मुंबई, लहान वयात मोठं स्वप्न; मुंबई दर्शनातून ते विधानभवनापर्यंत

विद्यार्थ्यांनी अनुभवली जिवाची मुंबई, लहान वयात मोठं स्वप्न; मुंबई दर्शनातून ते विधानभवनापर्यंत

March 25, 2026
बांधकाम कामगार स्थानिक सल्लागार शासकीय समिती स्थापन; अध्यक्षपदी आमदार उत्तमराव जानकर

बांधकाम कामगार स्थानिक सल्लागार शासकीय समिती स्थापन; अध्यक्षपदी आमदार उत्तमराव जानकर

March 25, 2026
श्रावस्ती बुद्ध विहार बार्शी येथे वधू वर परिचय मेळावा उत्साहात संपन्न 

श्रावस्ती बुद्ध विहार बार्शी येथे वधू वर परिचय मेळावा उत्साहात संपन्न 

March 25, 2026
वरुणराज कळसे यांना पीएच. डी. प्रदान

वरुणराज कळसे यांना पीएच. डी. प्रदान

March 25, 2026

फेसबुक पेज

मनोरंजन

‘लास्ट स्टॉप खांदा’ चित्रपटाचा दमदार ट्रेलर लाँच ; २१ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला

byतरुण भारत
November 12, 2025
0

सोलापूर - सध्या जोरदार चर्चेत असलेल्या 'लास्ट स्टॉप खांदा...' या चित्रपटातून प्रेमाचा इमोशनल, कॉमेडी ड्रामा उलगडणार आहे.उत्तम लेखन,अभिनय,संगीत असलेला,पुरेपूर मनोरंजन...

दिल्लीसह 26 राज्यांमध्ये अतिवृष्टीचा इशारा

राज्यभरात पुढील चार दिवस अतिवृष्टीचा इशारा!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 16, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ मुंबई :  राज्यात गेल्या दोन दिवसापासून सुरू असलेली पावसाची संततधार  पुढील चार दिवस कायम रहाणार आहे. २१...

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 11, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ तामसा : तामसा येथे जागतिक आदिवासी दिनाच्या औचित्याने आदिवासी समाजाकडून आदिवासी संस्कृतीचे दर्शन घडविण्यात आले. येथील नवीन...

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  प्रायोगिक रंगभूमीला भक्कम आणि सशक्त बनवण्यासाठी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेने 'प्रायोगिक रंगमंच संघ' मुंबई या संस्थेला...

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज : वाद निर्माण होतील असे चित्रपट बनवायचे म्हणजे त्याविषयी समाजात मोठ्या प्रमाणात चर्चा होते, त्याचा निषेध केला...

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 29, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत ग्रामीण विकास, महिला सुरक्षा, शेती बाजारपेठ, जलसंपदा आणि...

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 23, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/श्याम ठाणेदार : मराठी चित्रपट आणि नाट्य सृष्टीतील जेष्ठ अभिनेते जयंत सावरकर यांचा दुसरा स्मृतिदिन. बरोबर एक वर्षापूर्वी...

Load More

राजकीय

आयटी पार्कसाठी २० हेक्टर जमीन औद्योगिक महामंडळाला हस्तांतरित करण्याचे आदेश

byतरुण भारत
February 22, 2026
0

सोलापूर : आयटी पार्कसाठी होटगी येथील गट नंबर ५७६ मधील २० हेक्टर (५० एकर) जमीन औद्योगिक महामंडळाला हस्तांतरित करण्याचे आदेश...

राहुल गांधींच्या प्रतिमेला ‘जोडे मारो’ आंदोलन

byतरुण भारत
February 22, 2026
0

सोलापूर - देशाचे तंत्रवैभव जगासमोर मांडणाऱ्या 'इंडिया एआय इम्पॅक्ट समिट'मध्ये युथ काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी केलेल्या गोंधळाचे पडसाद आता सोलापुरात उमटू लागले...

राष्ट्रवादी प्रदेश सचिव पदी अॅंड विजयसिंह गिड्डे 

byतरुण भारत
February 19, 2026
0

मोडनिंब - राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाच्या प्रदेश सचिव पदी  मोडनिंब (ता. माढा) येथील अॅंड विजयसिंह गिड्डे यांची निवड झाली...

कार्यकर्त्यांच्या एकजुटीमुळे हत्तूरचा बालेकिल्ला शिवसेनेच्या ताब्यात 

byतरुण भारत
February 15, 2026
0

दक्षिण सोलापूर - लाडकी बहीण व भाजपच्या लाटेतही हत्तूरचा बालेकिल्ला ताब्यात ठेवण्यात शिवसेनेला यश आला आहे. जिल्हाप्रमुख अमर पाटील यांची...

Load More

आमच्याबद्दल

dainiktarunbharat.com

“सोलापूर तरुण भारत” हे नाव सोलापूर, धाराशिव, लातूर, नांदेड, जालना, बीदर, गुलबर्गा, संभाजीनगर (औरंगाबाद ), सातारा, सांगली, कोल्हापूर या जिल्ह्यात सर्वांच्या परिचयाचे आहे. वाचकांच्या प्रेमाचे आणि ‘तरुण भारत’ने सांभाळलेल्या मूल्यांचेच हे यश आहे.
यशाला शेवटचा असा टप्पा नसतो. त्यामुळेच आता प्रत्येकाच्या हातातील स्मार्ट फोनवर, टेबलवरील कॉम्प्युटर स्क्रीनवर ‘तरुण भारत’ वाचता येईल. जगभरातील वाचकांना ‘तरुण भारत’ वेब आवृत्तीच्या स्वरुपात नव्या तंत्रज्ञानाच्या सहाय्याने उपलब्ध होत आहे.

Subscribe Our Youtube Channel

वेबसाईट दर्शक

0765297

वृत्त संग्रह

March 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
23242526272829
3031  
« Feb    
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy
  • Cancellation / Refund policy
  • Shipping Policy
  • Terms and Conditions

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories

© Website Design by Digital Buffalo - 9028927697