सोलापूर : महापौरपदी विनायक रामकृष्ण कोंड्याल यांची निवड झाल्याबद्दल शहरातील विविध तेलुगू सामाजिक, शैक्षणिक व सांस्कृतिक संस्थांच्या वतीने सत्कार करून शुभेच्छा देण्यात आल्या.
यावेळी तेलुगू भाषा अभिवृद्धी सार्वजनिक ग्रंथालय,तेलुगू देशम पार्टी, व डॉ. एन. टी. रामाराव शैक्षणिक, सांस्कृतिक व क्रीडा मंडळ (सोलापूर) चे अध्यक्ष गणेरी तिप्पन्ना यांनी शुभेच्छापत्र देऊन अभिनंदन केले. तसेच उपाध्यक्ष इंजामुरी जनार्धन, कार्याध्यक्ष पोतु रामुलू, कार्यकारी उपाध्यक्ष गोसकी श्रीनिवास, सचिव चिन्नाराजु तिप्पन्ना, संयुक्त सचिव गणेरी श्रीनिवास, खजिनदार अक्कल नागनाथ, उपखजिनदार देवरकोंडा शंकर आदी पदाधिकाऱ्यांनी शुभेच्छा दिल्या.यावेळी कनकी नरसिंह, नंदल श्रीनिवास, मॅडम बालकृष्ण यांनी अभिनंदन व्यक्त केले.अध्यक्ष मल्लिकार्जुन कमटम, एक्झिक्युटिव्ह चेअरमन बालराजू बोल्ली, उपाध्यक्ष श्रीनिवास यंगनडुल, सचिव तिप्पन्ना गणेरी, संयुक्त सचिव प्रभाकर भीमनाथ, खजिनदार श्रीनिवास गल्लि यांनी शुभेच्छा दिल्या.
या सर्व संस्थांच्या पदाधिकाऱ्यांनी सोलापूर शहरातील सुमारे पाच लाख तेलुगू भाषिक नागरिकांच्या वतीने विनायक कोंड्याल यांना हार्दिक शुभेच्छा दिल्या. त्यांच्या नेतृत्वाखाली शहराचा सर्वांगीण विकास होईल, शिक्षण, संस्कृती, क्रीडा व सामाजिक क्षेत्रांना अधिक चालना मिळेल, असा विश्वास व्यक्त करण्यात आला.

























