जाफ्राबाद प्रतिनिधी
सोमवार दिनांक 15 जुलै पासुन जानेफळ पंडीत येथे स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते मयुर बोर्डे शेतकऱ्यांच्या विविध मागण्यासाठी बेमुदत अन्नत्याग आंदोलन करत आहे.सातत्याने दोन तीन वर्षापासून शेतकरी नैसर्गिक अस्मानी सुलतानी संकटांना सामोर जात आहे,हातात आलेलं पिक संपूर्ण पणे नष्ट होत आहे,कधी कोरडा तर कधी ओला दुष्काळ शेतकऱ्यावर संकट घेऊन उभा आहे,दोन हजार तेवीस मध्ये खरीप हंगामात एकवीस दिवसापेक्षा जास्त पावसाचा खंड पडल्याने खरीप चे पिके नष्ट झाले त्यातच यलो मोज्याक नावाचा व्हायरस सोयाबीन वर आला त्यात बाकीचे पिक नष्ट झाले,
रब्बी हंगामात देखील पिक हातातून गेले,खरीप हंगामातील मंजुर असलेला पिक विमा व रब्बी हंगामातील पिक विमा तात्काळ जमा करावा तसेच मागील दोन वर्षाचा रिलायन्स व एच डी एफ सी इरगो,या कंपनीकडे देखील शेतकऱ्यांचा बराचसा विमा बाकी आहे,या सर्व कंपन्यावर शेतकऱ्यांची फसवणूक केली म्हणून गुन्हा दाखल करावा व पिक तात्काळ जमा करावा ही मागणी घेऊन मयुर बोर्डे अन्नत्याग करत आहेत.तसेच दुष्काळाची रक्कम देखील जमा करावी असे देखील त्यांची मागणी आहे.
मागण्या जो पर्यंत मान्य होत नाही तो पर्यंत अन्नाचा कण सुद्धा घेणार नाही असा पवित्रा त्यांनी घेतला.सोमवार जानेफळ पंडीत येथे सायंकाळी सहाच्या दरम्यान स्थानिक तालुका प्रशासनातील तालुका कृषी अधिकारी शिंदे व त्यांचे शिष्टमंडळ पोलिस निरीक्षक प्रताप इंगळे साहेब यांच्या सह मोठ्या पोलीस बंदोबस्त घेऊन आले परंतु जो पर्यंत पिक विमा कंपन्यांवर गुन्हा दाखल होत नाही व विमा पडण्यास सुरुवात होत नाही तो पर्यंत माघार घेणार नाही असे मयुर बोर्डे यांनी सांगितले.त्यांच्या आक्रमक पवित्र्याने प्रशासनाची चांगलीच तारांबळ उडाली. या प्रसंगी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे कार्यकर्ते शेतकरी मोठ्या प्रमाणात आंदोलन स्थळी उपस्थीत आहेत.