तभा फ्लॅश न्यूज/सोलापूर : सोलापूर सह महाराष्ट्रातील महिला बिडी कामगारांच्या किमान वेतना संबंधी, संयुक्त बैठक आयोजित करण्याचे आश्वासन महाराष्ट्र राज्याचे कामगार मंत्री आकाश फुंडकर यांनी कामगार सेनेच्या शिष्टमंडळास दिले असल्याची माहिती, महाराष्ट्र कामगार सेनेचे प्रदेशाध्यक्ष विष्णू कारमपुरी (महाराज) यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली आहे.
सोलापूरसह महाराष्ट्रातील महिला बिडी कामगारांना गेल्या अनेक वर्षापासून किमान वेतनाची अंमलबजावणी केली जात नाही. याबाबत गेल्या पाच वर्षापासून शासन व प्रशासन दरबारी वेळोवेळी निवेदनाद्वारे व आंदोलनाद्वारे, महाराष्ट्र कामगार सेनेच्या व इतर कामगार संघटनेच्या वतीने मागणी करण्यात येत आहे., परंतु शासन याची कुठलीही दखल घेत नाही म्हणून, महाराष्ट्र कामगार सेनेच्या वतीने थेट कामगार मंत्र्यांना मंत्रालयात भेटून निवेदन देऊन,
लवकरात लवकर किमान वेतनाची अंमलबजावणी करण्यासाठी योग्य पाऊल उचलावे व कामगार, कामगार संघटना, विडी उद्योग संघ यांची एकत्रित बैठक आयोजित करण्यात यावी., अशी मागणी करण्यात आली. यावेळी मा. कामगार मंत्र्यांनी याबाबत लवकरच बैठक आयोजित करण्यात येईल असे सांगितले.
महाराष्ट्र कामगार सेनेचे प्रदेशाध्यक्ष विष्णू कारमपुरी (महाराज), यांच्या नेतृत्वाखाली कामगार मंत्री फुंडकर साहेब यांना बिडी कामगारांच्या किमान वेतनाबाबत निवेदन देणाऱ्या शिष्टमंडळात, रेखा आडकी, विठ्ठल कुऱ्हाडकर, श्रीनिवास बोगा, पप्पू शेख, सविता दासरी, लक्ष्मी गुंटला, राणी दासरी, अंगद जाधव, सोहेल शेख, गणेश बोडू, वैशाली बनसोडे यांचा समावेश होता.