परभणी – दिनांक 18/11/2025 रोज मंगळवार रोजी इटोली येथील 33kv वीज उपकेंद्रातून सोरजा, मोहखेड, गडदगव्हाण, वाडी,तांडा, तसेच डोंगरतळा, मांडवा, खरदडी, घेवंडा या गावाकरिता दोन वेगवेगळे फिडर काढण्यात आले आहेत.
वरील सर्व गावातील शेतकरी वर्षानुवर्षांपासून लाईट करिता त्रस्त होते. रात्री अपरात्री लाईट साठी शेतात जागरण करावं लागायचं. तसेच जीवाची परवा न करता रात्री लाईट साठी इटोली ला जावं लागायचं.
शेतकऱ्यांनी आपली व्यथा मा. रामप्रसादजी बोर्डीकर यांच्या कडे मांडली. मा. साहेबांनी हा प्रश्न गांभीर्याने घेतला आणि मा. ना. मेघना दिदी यांच्या माध्यमातून सोडवाला. सदरील फिडरचे आज भा. ज. पा. तालुकाध्यक्ष गोविंद भाऊ थिटे यांच्या हस्ते उदघाटन करण्यात आले. कार्यक्रमाचे अध्यक्ष मा. सुंदरराव चव्हाणहे होते, या प्रसंगी मा. मेघनादीदी यांचे स्वीय सहायक बाबासाहेब खेत्रे, अविनाशजी काळे,डॉ. देवराव कऱ्हाळे, लोभाजी नाईक, जगदीशजी घुगे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी नागेश तडकसे, बालाजी सांगळे, उमाकांत घळे, संतोष आढे, निवास घुगे, सर्जेराव नरवाडे, मोकिंदराव भालेराव, पदमाकर भालेराव, बाबुसाहेब शेळके,आश्रोबा चव्हाण, शालिकराम गडदे, गजानन हाके, माणिक आढे, गजानन गायकवाड, कांताप्पा टिळकरी व पंचक्रोशीतील सर्व गावचे सरपंच माजी सरपंच, भा. ज. पा. चे सर्व पदाधिकारी आणि सर्व गावाचे लाभार्थी शेतकरी उपस्थित होते. फिडर चे काम झाल्यामुळे सर्व शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण पाहण्यास मिळाले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मनोज तोडकर यांनी केले.


















