परभणी / जिंतूर – तालुक्यातील इटोली पंचकोशी परिसर शनिवारी (दि. ८ नोव्हेंबर) विकास, क्रीडा आणि सामाजिक उत्साहाने उजळून निघाला. सकाळपासून राज्यस्तरीय मॅरेथॉन स्पर्धा, भव्य नागरी सत्कार सोहळा आणि विविध विकासकामांच्या लोकार्पणाचा कार्यक्रम उत्साहात पार पडला. राज्याच्या राज्यमंत्री तथा परभणी जिल्ह्याच्या पालकमंत्री मा. मेघना बोर्डीकर यांच्या शुभहस्ते या विकासकामांचे लोकार्पण करण्यात आले.
सकाळी १० वाजता राज्यस्तरीय मॅरेथॉन स्पर्धेला प्रारंभ झाला. स्पर्धेत सहभागी खेळाडूंनी दमदार कामगिरी करत परिसरातील क्रीडाप्रेमींना मंत्रमुग्ध केले. विजेत्यांना पारितोषिक, मानपत्र आणि पुष्पगुच्छ देऊन सन्मानित करण्यात आले. यानंतर बसस्थानक परिसरात नागरी सत्कार सोहळा पार पडला.
आडगाव बाजार सर्कल परिसरातील सर्व गाव, वाडी, तांडा आणि वस्ती येथील नागरिकांसह सामाजिक, राजकीय, धार्मिक संस्था तसेच विविध संघटनांच्या वतीने राज्यमंत्री मेघना बोर्डीकर यांचा भव्य नागरी सत्कार करण्यात आला. तब्बल दोन तास चाललेल्या या कार्यक्रमात मान्यवरांनी आपली मनोगते व्यक्त केली.
या प्रसंगी बोलताना मंत्री बोर्डीकर म्हणाल्या, “राज्यात डबल इंजिन सरकार कार्यरत आहे. आता स्थानिक स्वराज्य संस्थांवरही भाजपाचा झेंडा फडकवून ट्रिपल इंजिन सरकार घडवायचे आहे. त्यामुळे विकासाची गंगा सर्व स्तरांपर्यंत पोहोचेल. त्यासाठी नागरिकांनी नगरपरिषद, जिल्हा परिषद, पंचायत समिती आणि ग्रामपंचायत निवडणुकीत भाजपाच्या उमेदवारांच्या पाठीशी ठामपणे उभे राहावे.”
दरम्यान, इटोली ग्रामपंचायत आणि समता फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने नेत्र तपासणी व मोफत शस्त्रक्रिया शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या उपक्रमाला ग्रामस्थांचा मोठा प्रतिसाद मिळाला.
कार्यक्रमास मा. रमेशचंद्र दरगड (अध्यक्ष, व्यापारी महासंघ जिंतूर), संजय गांधी योजनेचे तालुकाध्यक्ष डॉक्टर पंडितराव दराडे भाजप तालुका अध्यक्ष गोविंद भाऊ थिटे रवी सर भोगावकर श्रीनि वास घुगे सरपंच डिग्रसमाजी जि.प. सदस्य सौ. अरुणा काळे, अविनाश काळे, नानासाहेब राऊत, सुंदरराव चव्हाण (उपसभापती, कु.उ.बा.स. जिंतूर), गंगाधर तरटे सचिन आडे जामकर अजित भोबे पाटील माथलेकर डॉक्टर देवराव कराळे मीनाताई कराळे नंदाताई निंबाळकर प्रदीप राव दाभाडे सरपंच आडगाव रोहन गायकवाड गंगाधर तरटे आप्पाआदी मान्यवर उपस्थित होते.
राज्यमंत्री बोर्डीकर यांनी इटोली परिसरातील सुरू असलेल्या विकासकामांची पाहणी करून ती वेळेत पूर्ण करण्याचे आश्वासन दिले. ग्रामस्थांच्या एकजुटीचे कौतुक करत त्यांनी विकासात सक्रिय सहभाग ठेवण्याचे आवाहन केले.
ग्रामपंचायत इटोली चे सरपंच संगीता ताई जगदीश राव घुगे यांच्या पुढाकारामुळे आणि सर्व ग्रामस्थांच्या सहकार्यामुळे हा सोहळा शिस्तबद्ध व उत्साहात पार पडला. शेवटी उपस्थित मान्यवरांनी ग्रामस्थांचे अभिनंदन करत भविष्यातही अशा उपक्रमांत सक्रिय सहभागाची अपेक्षा व्यक्त केली. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन जगदीश राव घुगे पाटील यांनी केले यांनी केले




















