धाराशिव – जिल्हा सराफ व सुवर्णकार फेडरेशन असोसिएशन यांच्या वतीने 13 मार्च 2026 रोजी सराफ व सुवर्णकार बांधवांसाठी मार्गदर्शनपर शिबिराचे आयोजन सोनाई फंक्शन हॉल, बार्शी बायपास रोड, धाराशिव येथे करण्यात आले. या शिबिराला जिल्ह्यातील व्यापाऱ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.
या कार्यक्रमात मुंबई येथील सराफ सुवर्णकार व्यापारातील तज्ञ तखतमलजी परमार यांनी सुवर्णकार व्यवसायातील बदलते प्रवाह, आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर व व्यवसायातील संधी याबाबत मार्गदर्शन केले. तसेच सराफ सुवर्णकार बांधवांना सदैव मदत करणारे राकेशजी सुराणा आणि धाराशिव जिल्हा मार्गदर्शक किशोरजी गोरे यांनीही उपस्थितांना मोलाचे मार्गदर्शन केले.या शिबिराला धाराशिवसह परंडा, भूम, वाशी, कळम, येरमाळा, येडशी, तेर, नळदुर्ग, अंदुर, ईटकळ, जळकोट, मुरूम, लोहारा, माकणी, उमरगा आदी भागांतून तसेच संपूर्ण धाराशिव जिल्ह्यातून मोठ्या संख्येने सराफ व सुवर्णकार बांधव उपस्थित होते.
या मेळाव्याचे आयोजन धाराशिव जिल्हा सराफ सुवर्णकार असोसिएशनचे जिल्हाध्यक्ष दत्ताजी माळी (गोरे) व जिल्हा सचिव मयूर जालनेकर यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले. तसेच सर्व तालुक्यांचे अध्यक्ष व पदाधिकाऱ्यांनी अथक परिश्रम घेऊन हा मेळावा यशस्वीरीत्या पार पाडला.


























