Thursday, April 30, 2026
dainiktarunbharat.com
Solapur Tarun Bharat
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register
No Result
View All Result
dainiktarunbharat.com
No Result
View All Result

बसस्थानकाचे ‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर बसस्थानक’ नामकरण करण्यासाठी भव्य मोर्चा

तरुण भारतbyतरुण भारत
March 15, 2026
in editor
0
बसस्थानकाचे ‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर बसस्थानक’ नामकरण करण्यासाठी भव्य मोर्चा
0
SHARES
4
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

टेंभुर्णी : बहुजन सत्यशोधक संघ या राष्ट्रव्यापी संघटनेच्या वतीने टेंभुर्णी शहरात शुक्रवार (दि. १३ मार्च) रोजी विविध मागण्यांसाठी भव्य मोर्चा काढण्यात आला. टेंभुर्णी येथील बसस्थानकाचे “डॉ. बाबासाहेब आंबेडकर बसस्थानक – टेंभुर्णी” असे नामकरण करण्यात यावे, तसेच सामाजिक न्याय विभाग व बार्टी संस्थेतील अनुसूचित जाती-जमातींच्या विकासासाठी असलेला निधी इतरत्र वळविणाऱ्या शासनाच्या निर्णयाचा यावेळी तीव्र निषेध करण्यात आला.

मोर्चाची सुरुवात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादनाने करण्यात आली. तसेच महात्मा ज्योतिराव फुले आणि अण्णाभाऊ साठे यांच्या प्रतिमांनाही अभिवादन करण्यात आले. त्यानंतर शहरातील प्रमुख मार्गांवरून मोर्चा काढण्यात आला. शेवटी टेंभुर्णी पोलीस ठाण्यासमोर मोर्चाची सांगता करण्यात आली.

यावेळी बहुजन सत्यशोधक संघाचे राष्ट्रीय अध्यक्ष सुनील ओव्हाळ यांनी सामाजिक न्याय विभाग व बार्टी संस्थेतील अनुसूचित जाती-जमातींच्या विकासासाठी असलेला निधी शासनाकडून इतरत्र वळविला जात असल्याचा आरोप केला. या निर्णयामुळे अनुसूचित जाती व जमातीतील विद्यार्थ्यांचे मोठे नुकसान होत असल्याचे त्यांनी सांगितले. शासनाने हा निर्णय तात्काळ मागे घ्यावा, अन्यथा मुंबई येथील आझाद मैदान येथे तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशाराही त्यांनी दिला. तसेच येत्या १४ तारखेपर्यंत टेंभुर्णी बसस्थानकाचे नामकरण न झाल्यास महार वतन जागेतून बसस्थानक हटविण्याचा इशाराही त्यांनी दिला.

यावेळी महावीर वजाळे यांनी सांगितले की, सन १९४२ साली डॉ. बाबासाहेब आंबेडकर टेंभुर्णी येथे आले होते आणि त्यांनी कार्यकर्त्यांची बैठक घेतली होती. त्यामुळे टेंभुर्णी ही ऐतिहासिक भूमी आहे. तसेच सध्याचे बसस्थानक महार वतन जागेत असल्याने त्या बसस्थानकाचे “डॉ. बाबासाहेब आंबेडकर बसस्थानक – टेंभुर्णी” असे नामकरण तात्काळ करण्यात यावे, अशी मागणी त्यांनी केली.

यावेळी वडार समाजाचे नेते बाबा धोत्रे, महेंद्र सोनवणे, रणजित गायकवाड तसेच अधिवक्ता तुकाराम राऊत यांनीही बसस्थानकाचे नामकरण लवकरात लवकर न झाल्यास तीव्र स्वरूपाचे आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा दिला.

या मोर्चामध्ये परमेश्वर खरात, यशपाल लोंढे, राजकुमार लांडगे, समीर नाईकनवरे, बिभीषण कांबळे, भीमा साळवे, अमर गायकवाड, अरविंद गायकवाड, सनी खरात, सूरज शिंदे, पोपट लोंढे, बबन किर्ते, निलेश खरात, राजवर्धन वजाळे, बाळासाहेब खरात, सचिन खरात, प्रशांत गायकवाड, श्रीकांत जवंजाळ, आबासाहेब पाटोळे, प्रकाश गायकवाड, राजाभाऊ शिंदे, मनोज शिंदे, महेंद्र शिंदे, कृष्णा पवार, उल्हास खरे, लक्ष्मण शिंदे, अतिश ओहोळ, सतीश वाघमारे, मल्हारी फाळके, समाधान कांबळे, विकी भोसले, गौतमी गायकवाड आदींसह शेकडो कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

या वेळी शासनाच्या वतीने टेंभुर्णी मंडळ अधिकारी सुजित शेळवणे, ग्राम महसूल अधिकारी शिवाजी घाडगे तसेच पोलीस उपनिरीक्षक अजित मोरे यांनी निवेदन स्वीकारले.

Post Views: 24
Previous Post

राजकीय अन्याया विरोधात थाळी नाद आंदोलन

Next Post

धाराशिवमध्ये सराफ व सुवर्णकार बांधवांसाठी मार्गदर्शनपर शिबिर उत्साहात

तरुण भारत

तरुण भारत

Next Post
धाराशिवमध्ये सराफ व सुवर्णकार बांधवांसाठी मार्गदर्शनपर शिबिर उत्साहात

धाराशिवमध्ये सराफ व सुवर्णकार बांधवांसाठी मार्गदर्शनपर शिबिर उत्साहात

ताज्या बातम्या

रस्ता खोदल्याने पाण्याचे डबके वालसावंगी पारस सिमेंट रस्त्याचे काम महिन्यापासून बंद

April 30, 2026

सिंहगडच्या विद्यार्थ्यांची ऐतिहासिक कामगिरी

April 30, 2026

सोलापुरात आयपीएल फॅन पार्क ; क्रिकेटप्रेमींसाठी स्टेडियमसारखा थरार

April 30, 2026

सोलापूरचा समृद्धी तर शेवतेचा आदर्श संघ जिल्हा चॅम्पियन

April 30, 2026

महाराष्ट्र दिनानिमित्त मोफत आरोग्य शिबिर

April 30, 2026

सोयगाव मध्ये अवैध लाकूड वाहतूक करणारी ट्रक जप्त

April 30, 2026

तत्कालीन जिल्हाक्रीडा अधिकारी नितीन तारळकर निलंबित

April 30, 2026

बाहुबली मंदिरात पूज्य वीरसागर मुनिश्रींचे ,ससंघ उत्साहात स्वागत

April 30, 2026

फेसबुक पेज

मनोरंजन

‘लास्ट स्टॉप खांदा’ चित्रपटाचा दमदार ट्रेलर लाँच ; २१ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला

byतरुण भारत
November 12, 2025
0

सोलापूर - सध्या जोरदार चर्चेत असलेल्या 'लास्ट स्टॉप खांदा...' या चित्रपटातून प्रेमाचा इमोशनल, कॉमेडी ड्रामा उलगडणार आहे.उत्तम लेखन,अभिनय,संगीत असलेला,पुरेपूर मनोरंजन...

दिल्लीसह 26 राज्यांमध्ये अतिवृष्टीचा इशारा

राज्यभरात पुढील चार दिवस अतिवृष्टीचा इशारा!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 16, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ मुंबई :  राज्यात गेल्या दोन दिवसापासून सुरू असलेली पावसाची संततधार  पुढील चार दिवस कायम रहाणार आहे. २१...

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 11, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ तामसा : तामसा येथे जागतिक आदिवासी दिनाच्या औचित्याने आदिवासी समाजाकडून आदिवासी संस्कृतीचे दर्शन घडविण्यात आले. येथील नवीन...

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  प्रायोगिक रंगभूमीला भक्कम आणि सशक्त बनवण्यासाठी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेने 'प्रायोगिक रंगमंच संघ' मुंबई या संस्थेला...

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज : वाद निर्माण होतील असे चित्रपट बनवायचे म्हणजे त्याविषयी समाजात मोठ्या प्रमाणात चर्चा होते, त्याचा निषेध केला...

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 29, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत ग्रामीण विकास, महिला सुरक्षा, शेती बाजारपेठ, जलसंपदा आणि...

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 23, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/श्याम ठाणेदार : मराठी चित्रपट आणि नाट्य सृष्टीतील जेष्ठ अभिनेते जयंत सावरकर यांचा दुसरा स्मृतिदिन. बरोबर एक वर्षापूर्वी...

Load More

राजकीय

आयटी पार्कसाठी २० हेक्टर जमीन औद्योगिक महामंडळाला हस्तांतरित करण्याचे आदेश

byतरुण भारत
February 22, 2026
0

सोलापूर : आयटी पार्कसाठी होटगी येथील गट नंबर ५७६ मधील २० हेक्टर (५० एकर) जमीन औद्योगिक महामंडळाला हस्तांतरित करण्याचे आदेश...

राहुल गांधींच्या प्रतिमेला ‘जोडे मारो’ आंदोलन

byतरुण भारत
February 22, 2026
0

सोलापूर - देशाचे तंत्रवैभव जगासमोर मांडणाऱ्या 'इंडिया एआय इम्पॅक्ट समिट'मध्ये युथ काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी केलेल्या गोंधळाचे पडसाद आता सोलापुरात उमटू लागले...

राष्ट्रवादी प्रदेश सचिव पदी अॅंड विजयसिंह गिड्डे 

byतरुण भारत
February 19, 2026
0

मोडनिंब - राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाच्या प्रदेश सचिव पदी  मोडनिंब (ता. माढा) येथील अॅंड विजयसिंह गिड्डे यांची निवड झाली...

कार्यकर्त्यांच्या एकजुटीमुळे हत्तूरचा बालेकिल्ला शिवसेनेच्या ताब्यात 

byतरुण भारत
February 15, 2026
0

दक्षिण सोलापूर - लाडकी बहीण व भाजपच्या लाटेतही हत्तूरचा बालेकिल्ला ताब्यात ठेवण्यात शिवसेनेला यश आला आहे. जिल्हाप्रमुख अमर पाटील यांची...

Load More

आमच्याबद्दल

dainiktarunbharat.com

“सोलापूर तरुण भारत” हे नाव सोलापूर, धाराशिव, लातूर, नांदेड, जालना, बीदर, गुलबर्गा, संभाजीनगर (औरंगाबाद ), सातारा, सांगली, कोल्हापूर या जिल्ह्यात सर्वांच्या परिचयाचे आहे. वाचकांच्या प्रेमाचे आणि ‘तरुण भारत’ने सांभाळलेल्या मूल्यांचेच हे यश आहे.
यशाला शेवटचा असा टप्पा नसतो. त्यामुळेच आता प्रत्येकाच्या हातातील स्मार्ट फोनवर, टेबलवरील कॉम्प्युटर स्क्रीनवर ‘तरुण भारत’ वाचता येईल. जगभरातील वाचकांना ‘तरुण भारत’ वेब आवृत्तीच्या स्वरुपात नव्या तंत्रज्ञानाच्या सहाय्याने उपलब्ध होत आहे.

Subscribe Our Youtube Channel

वेबसाईट दर्शक

0838622

वृत्त संग्रह

April 2026
M T W T F S S
 12345
6789101112
13141516171819
20212223242526
27282930  
« Mar    
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy
  • Cancellation / Refund policy
  • Shipping Policy
  • Terms and Conditions

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register

© Website Design by Digital Buffalo - 9028927697