सोलापूर – 16 नोव्हेंबर 2025 रोजी झालेल्या 25 व्या ओपन इंटरनॅशनल ॲबॅकस अँड वेदिक मॅथ्स कॉम्पिटिशन मधील गुणवंत विद्यार्थ्याचा सत्कार सोहळा रविवारी शिव छत्रपती रंगभवन येथे दिमाखात संपन्न झाला.
याठिकाणी वंडरकीड सीमास ॲबॅकस अकॅडेमी च्या 37 विद्यार्थ्यांना विविध पुरस्कार देऊन गौरवण्यात आले तर या अकॅडेमीच्या संचालिका सौ. ज्ञानेश्वरी मठ यांना बेस्ट फ्रेंचाईसी च्या तृतीय क्रमांकाने सन्मानित करण्यात आले.
कार्यक्रमाच्या प्रमुख पाहुण्या सौ. आदिती कुलकर्णी यांनी अमृता मठ हिला चॅम्पियन ऑफ चॅम्पियन तर मोहम्मद आदिल आणि स्वरा देवकते यांना चॅम्पियन चा पुरस्कार देऊन प्रोत्साहित केले.
























