पंढरपूर – महर्षी वाल्मिक कर्मचारी मंडळ, पंढरपूर यांचे वतीने श्रीराम मंगल कार्यालय येथे महर्षी वाल्मिकऋ्षी यांचे प्रतिमेचे पूजन व दहावीतील गुणवंत विद्यार्थ्यांचा गुणगौरव कार्यक्रम माजी नगराध्यक्ष बाबा अधटराव व मंडळाचे अध्यक्ष शंकर माने यांचे हस्ते करण्यात आले.
दरवर्षी प्रमाणे मंडळाच्या वतीने शहरातील महादेव कोळी समाजातील दहावीतील गुणवत्ता प्राप्त गुणवंत विद्यार्थ्यांचे पारितोषिक वितरण मंडळाच्या वतीने करण्यात आले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक सचिव सुरेश शिंदे यांनी केले.श्री पुंडलिक देवस्थानचे नूतन अध्यक्ष बाबा अधटराव, उपाध्यक्ष अनिल अभंगराव, सचिव उमेश संगितराव, खजिनदार सतिश नेहतराव व इतर विश्वस्तांचा सत्कार मंडळाच्या वतीने करण्यात आला.
यावेळी मार्गदर्शन करताना बाबा अधटराव यांनी कर्मचारी मंडळाचा गुणवंत विद्यार्थ्यांना बक्षिसे देवून व समाजातील सेवाभावी कार्यकर्त्यांना मानधन देवून गौरव करतात हे स्तुत्य कार्य करीत आहात असे सांगितले.
कार्यक्रमात गुणवत्ता प्राप्त विद्यार्थी जान्हवी कोळी, समर्थ नेहतराव, गोपिका कोळी, अंकुश माने, श्रेया पवार आदींना बक्षिसे देण्यात आली. मंडळाचे पदाधिकारी रामचंद्र खडाखडे, दिलीप कोताळकर, विजय अधटराव, चंद्रकांत परचंडे, अक्षय संगितराव, संजय चौधरी,अशोक ननवरे आदी व पुंडलिक देवस्थान ट्रस्टचे सर्व विश्वस्त,गुणवंत विद्यार्थी व समाज बांधव उपस्थित होते.