सोलापूर – शिवसेनेचे उपनेते माजी आमदार व संपर्क प्रमुख संजय कदम यांच्या हस्ते अमितकुमार अजनाळकर यांचा जाहीर प्रवेश करण्यात आला. त्यांनी सोलापूर दक्षिण विधानसभा निवडणूक 2019 साली MIM पक्षाकडून लढवली होती. पोलीस भरती अकॅडमीच्या माध्यमातून त्यांनी शेकडो विद्यार्थ्यांचे भविष्य घडवत समाजकार्य केले आहे.
एक तडफदार कार्यकर्ता शिवसेनेच्या गळाला लागल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. भविष्यकाळात शिवसेनेचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे कार्य तळागाळापर्यंत पोचवण्यासाठी सदैव कार्यरत राहणार असल्याचे अमितकुमार अजनाळकर सरांनी सांगितले.
याप्रसंगी माजी आमदार शहाजी पाटील, माजी मंत्री उत्तमप्रकाश खंदारे, शिवसेना राज्य प्रवक्त्या ज्योती वाघमारे, जिल्हाप्रमुख अमर पाटील, अमोल शिंदे, शहर प्रमुख सचिन चव्हाण, महिला जिल्हा संपर्क प्रमुख अनिता माळगे, माजी जिल्हा प्रमुख तथा नगरसेवक मनोज शेजवाळ, माजी जिल्हा प्रमुख मनीष काळजे, अल्पसंख्यांक जिल्हा प्रमुख एजाज शेख, शहर प्रमुख गफूर शेख, मोहसीन शेख, संपर्क प्रमुख रजा मुजावर, उप शहर प्रमुख मोईन शेख आदी उपस्थित होते .


























