अक्कलकोट – तालुक्यातील मैंद्रगी नगरपालिका उपनगराध्यक्षपदी सुरेश नागुर यांचा बिनविरोध निवड करण्यात आला असून नगराध्यक्षा अंजली बाजारामठ यांनी पदभार घेतली.आमदार सचिन कल्याणशेट्टी, भाजपचे माजी जिल्हाध्यक्ष शहाजी पवार व भाजप अध्यक्ष प्रदीप पाटील यांच्या हस्ते नवनिर्वाचित नगराध्यक्ष, उपनगराध्यक्ष तसेच नगरसेवकांचा गौरव करण्यात आला.
या निवड प्रक्रियेत सहायक अधिकारी म्हणून मुख्याधिकारी अर्जुन सुरवसे यांनी काम पाहिले.यावेळी स्विकृत नगरसेवकपदी सिद्धाराम जकापुरे, जाफर बेपारी यांची स्वीकृत निवड करण्यात आली. तर पक्षनेतेपदी सुरेखा होळीकट्टी यांची निवड करण्यात आली.
या प्रसंगी नगरसेवक चौडाबाई दर्गी, अब्दुल गनी बाबुडे, भीमशा पुजारी, कावेरी पुजारी, भीमणा पुजारी, शिवचलप्पा मुनोळी, रोहिणी निंबाळ, पिरेश भंगर्गी, भौरम्मा गुडद, लाडलेबक्ष लुकडे, मेहराज लुकडे, मुतणा करजगी, रेश्मा उस्ताद, स्वप्ना मोरे, तिपणा नागणसुर, सुरेखा होळीकट्टी, काशीनाथ जकापुरे, बमनळळी, आरेनवरू, शिवम्मा विठ्ठल सरस्वती पोतेनवरू आदी उपस्थित होते.
यावेळी राजशेखर मसूती,दयानंद बमनळळी, अनिल पाटील, तुकप्पा नागुर, मोतीराम राठोड, अशोक लोहार, नागणा दर्गी, बसवराज बेंणेसूर, रुडप्पा येळसंगी, विश्वनाथ हिरेमठ, श्रीशैल बिज्जरगी, योगीनाथ बाजारामठ आदी मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन राजेंद्र गायधनकर यांनी तर आभार वैशाली नन्ना यांनी मानले.
मैंदर्गी (ता. अक्कलकोट) येथे नवनिर्वाचित नगराध्यक्ष अंजली बाजारमठ, उपनगराध्यक्ष सुरेश नागूर व स्वीकृत नगरसेवकांचा सत्कार करताना आमदार सचिन कल्याणशेट्टी, शहाजी पवार, राजशेखर मसूती आदी.
















