सोलापूर – जिल्हा परिषदेतील ई- ऑनलाईन निविदा प्रक्रियेत बेकायदेशीर होत असल्याचा आरोप महाराष्ट्र राज्य कंत्राटदार महासंघ, राज्य अभियंता संघटना, बिल्डर्स असोसिएशन ऑफ इंडिया, राज्य मजूर सहकारी संस्था, राज्य पाणी पुरवठा कंत्राटदार संघटना यांनी केला आहे. निविदामध्ये ठरवून नियमबाहय अटी घालून आर्थिक लाभ उठवून शासनाचे कोटयावधी रुपयांचे नुकसान झाल्याचा आरोप करण्यात आला आहे.
  मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, ग्रामविकास मंत्री, ग्रामसचिव,  मुख्य कार्यकारी अधिकारी यांना या संदर्भात वारंवार निवेदन दिले आहेत. या संदर्भात सविस्तर चौकशी न झाल्याने संघटनेने आंदोलनाचा इशारा दिला आहे. ३ नोव्हेंबरपर्यंत बेकायदेशीर ई-निविदा प्रक्रिया थांबवून संबंधित अधिकारी व कर्मचारी यांच्यावर कारवाई न झाल्यास या गंभीर प्रकरणावर ठोस निर्णय घेण्यासाठी व आंदोलनाची दिशा ठरविण्यासाठी बुधवार दिनांक नोव्हेंबर २०२५ रोजी दुपारी १२.३० वाजता जिल्हा समाज कल्याण केंद्र, रंगभवन येथे कंत्राटदारांची बैठक आयोजित करण्यात आली आहे. सदर महत्वाच्या बैठकीस उपस्थित राहण्याचे आवाहन महाराष्ट्र राज्य कंत्राटदार महासंघ, राज्य अभियंता संघटना, महाराष्ट्र राज्य ग्रामीण पाणी पुरवठा कंत्राटदार संघटनेचे राज्य अध्यक्ष मिलिंद भोसले, विल्डर्स असोसिएशन ऑफ इंडियाचे जिल्हाध्यक्ष संतोष कलगुडगी, माजी राज्याध्यक्ष दत्तात्रय मुळे, लेबर फेडरेशन सोलापूर जिल्हाध्यक्ष शंकरराव चौगुले, महाराष्ट्र राज्य कंत्राटदार महासंघाचे उपाध्यक्ष कांतीलाल दुबल, सचिव कैलास लांडे, राज्यसंघटक नरेंद्र भोसले, जिल्हा पाणी पुरवठा कंत्राटदार संघटना जिल्हाध्यक्ष आनंद तोडकरी, विवेक राठोड, सुर्यकांत बिराजदार, सोलापूर महानगरपालिका कॉन्टॅंक्टरचे जिल्हाध्यक्ष रामभाऊ दुधाळ यांनी केले आहे. 
राज्यभरात पुढील चार दिवस अतिवृष्टीचा इशारा!
तभा फ्लॅश न्यूज/ मुंबई : राज्यात गेल्या दोन दिवसापासून सुरू असलेली पावसाची संततधार पुढील चार दिवस कायम रहाणार आहे. २१...
 
	    	 
                                

















 
                