बार्शी – १७ वर्षीय अल्पवयीन मुलगी बेपत्ता झाली आहे. तिच्या ब्युटी पार्लरमध्ये सापडलेल्या चिठ्ठीने कुटुंबीयांमध्ये खळबळ उडाली असून, वडिलांनी बार्शी शहर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. अज्ञात व्यक्तीने फसवून पळवल्याचा संशय असून, विहिरीतील शोध मोहिमेतही तिचा ठावठिकाणा लागला नाही.
शेतकरी वडील (वय ४५) यांच्या कुटुंबात पत्नी, मुलगा व तीन मुली असे एकत्र राहतात. वडील शेती करतात, तर आई बार्शी येथे ब्युटी पार्लर चालवतात. लापता मुलगी १२ वीत शिकत असून, तिचे वय १७ वर्षे ८ महिने ८ दिवस आहे.
२७ ऑक्टोबर रोजी सकाळी ६.४५ वाजता वडिलांनी तिला सौंदरे येथील बस स्टॉपवरुन बार्शी येथील क्लासेससाठी सोडले. तेथून ती बार्शी बसने जाणार होती. सकाळी १०.३० वाजता आईंना पार्लरसाठी सोडण्यासाठी वडील पुन्हा सौंदरे गेले. मुलगी नेहमी दुपारी ११ वाजता गावातील बस थांब्यावर येत असे, पण १२ वाजेपर्यंत न आल्याने वडिलांनी आईंना फोन केला. आईंनी बसस्टँडवर शोध घेतला, पण ती सापडली नाही.
काही वेळाने आईंनी सांगितले की, पार्लरमध्ये मुलीने लिहिलेली चिठ्ठी सापडली. चिठ्ठीत ‘पुलाजवळच्या विहिरीत उडी मारुन जीव देणार’ असा मजकूर होता. वडील बार्शीला धावले. विहिरीजवळ मुलीची शाळेची बॅग व फोटो सापडला. लगेच बार्शी शहर पोलीस ठाण्यात चिठ्ठी दाखवली. शहर पोलिसांनी तत्परता दाखवत पोलीस, अग्निशमन दल व नगरपालिका कर्मचाऱ्यांनी सांगितलेल्या ठिकाणच्या विहिरीतील पाणी काढून शोध घेतला, तरी मुलगी सापडली नाही.
वडिलांच्या तक्रारीनुसार, सकाळी ६.४५ ते दुपारी १२ या वेळेत हिस संकेश्वर बोल, बेदराई विहिरीजवळील पार्लरमधून अज्ञात व्यक्तीने फसवून पळवले. ‘माझ्या संमतीशिवाय फूस लावून नेले’, असे म्हटले आहे. पोलिसांनी अज्ञात आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल केला. सीसीटीव्ही, बसस्टँड चौकशी, मोबाइल लोकेशन तपास सुरु आहे. मुलीचा फोन बंद आहे. पोलीस तपास सुरू आहे.
 
	    	 
                                



















 
                