निवडणूकीचे बिगुल वाजत नाही तोच घाटकोपरच्या स्टॅटिक सर्विलेन्स स्कॉडने ही कारवाई केली आहे. या प्रकरणी दोन जणांना पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. इलेक्शन सेलच्या स्टॅटिक सर्विलेन्स स्कॉडने गाडीतून 72 लाख 39 हजार 675 रुपये जप्त केले आहेत.
ताब्यात घेण्यात आलेल्या व्यक्तींपैकी एक सीए तर दुसरा इनक्मटॅक्स प्रॅक्टिसनर असल्याचे समोर आलं आहे. जप्त करण्यात आलेली रक्कम एका विकासकाकडून पाठवण्यात आल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे.
या प्रकरणी पंतनगर पोलिस आणि इलेक्शन सेलच्या स्टॅटिक सर्विलेन्स स्कॉड अधिक तपास करत आहेत.