धाराशिव – कोरेगाव पुलावर पाणी साचत असल्याने लोकांची गैरसोय होत होती त्यामुळे आमदार प्रवीण स्वामी यांनी आंदोलनाचा इशारा दिल्यानंतर तात्पुरते काम सुरू केले होते मात्र या ठिकाणी कायमस्वरूपी उपाययोजना करावी या मागणीसाठी आमदार प्रवीण स्वामी यांनी चक्क दोन तास पाण्यात बसून आंदोलन केले.
राष्ट्रीय महामार्गाच्या कोरेगाव फुलाखाली सतत पाणी थांबत असल्याने याबाबत कायमस्वरूपी उपाय योजना करावी अशी मागणी आमदार प्रवीण स्वामींनी गेल्या एक महिन्यापूर्वी लेखी निवेदनाद्वारे संबंधित विभागास केली होती मात्र आंदोलनाच्या दणक्यानंतर या ठिकाणी शुक्रवारी सकाळी तात्पुरतेचे काम सुरू करण्यात आले होते मात्र या ठिकाणी कायमस्वरूपी उपाययोजना करावी यासाठी आमदार प्रवीण स्वामी यांनी आज सकाळी 11 वाजता या पुलाच्या खाली असलेल्या पाण्यात चक्क दोन तास बसून आंदोलन सुरू केले. कायमस्वरूपी उपाययोजना केल्याशिवाय उठणार नाही अशी ताठर भूमिका घेतल्यानंतर संबंधित कंत्रालदार व अधिकारी यांनी याबाबत नरमाईची भूमिका घेत एक तासात या ठिकाणी सिमेंट काँक्रेटचे ्काम सुरू करू व दोन दिवसात हे काम पूर्ण करून पाण्याचा निचरा करण्यात येईल असे लेखी आश्वासन दिल्यानंतर हे आंदोलन मागे घेण्यात आले.
यावेळी शिवसेना युवा नेते डॉ अजिंक्य बापू पाटील सुधाकर पाटील विजयकुमार नागणे रणधीर पवार आप्पाराव गायकवाड प्रा डी के माने विजयकुमार तळभोगे धीरज बेळबकर सनी पाटील मनसे तालुकाप्रमुख हरिभाऊ जाधव हनमंत सुरवसे बालाजी मिरकले राम शिंदे मुन्ना पाटील बाळू शिंदे बाळू परांडे दत्ता शिंदे आदी शेतकरी व शिवसेना कार्यकर्ते सहभागी झाले होते


























