तभा फ्लॅश न्यूज/ लोहा : रिसनगाव व परिसरातील वन विभागाच्या जमिनीवर वन उद्यान उभारणार असून यासाठी शासनाकडून 10 कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून देणार असल्याचे आमदार प्रतापराव पाटील चिखलीकर यांनी आढावा बैठकीत सांगून जनतेने मोठ्या संख्येने वृक्ष लागवड करावी असे आव्हान केले आहे.
रिसनगाव तालुका लोहा येथे आमदार प्रतापराव पाटील चिखलीकर यांच्या अध्यक्षतेखाली वन विभागाची आढावा बैठक घेण्यात आली यावेळी उपवनसंरक्षक केशव वाबळे, सहाय्यक वनरक्षक खेलवाडे, वन परिमंडळ अधिकारी रासने,नायब तहसीलदार हाडगे, माजी उपनगराध्यक्ष दता वाले , माजी नगराध्यक्ष स्वप्निल लुंगारे, परिमंडळ अधिकारी हागदळे, वनरक्षक घुगे, सहाय्यक पोलीस निरीक्षक मुळीक, सार्वजनिक बांधकाम उप अभियंता मोहन पवार, जिल्हा परिषद बांधकाम उप अभियंता शिवाजी राठोड, वनरक्षक विजय मुंडे, माजी उपसभापती बालाजी कदम, सावरगाव मंडळ अधिकारी सूर्यवंशी मॅडम ग्रामसेवक रमेश राठोड यांच्यासह अन्य अधिकारी कर्मचारी या आढावा बैठकीला उपस्थित होते.
आढावा बैठकीत आमदार चिखलीकर यांनी रिसनगाव व परिसरातील अन्य गावातील वन जमिनीवर वन उद्यान उभारण्यासाठी शासनाकडे दहा कोटी रुपये उपलब्ध करण्यासाठी प्रस्ताव दाखल करणार असून जिल्हा नियोजन समितीकडून पाच कोटी रुपयाचा निधी उपलब्ध करून या ठिकाणी भव्य असे वन उद्यान उभारण्यात येणार आहे त्यासोबतच विविध प्राण्याची वाढ व्हावी. यासाठी मोठ्या संख्येने वृक्ष लागवड करण्यासाठी सर्वांनी पुढाकार घ्यावा व त्याचे संगोपन करावे भविष्यात येथे मोठ्या प्रमाणात जंगल उपलब्ध झाल्यानंतर आजूबाजूचे पर्यटक देखील या ठिकाणी भेट देण्यात येतील आणि या भागाचा मोठ्या प्रमाणात विकास देखील होणार आहे. वनक्षेत्र वाढल्याने या भागात हिंस्त्र प्राण्यांचा आदिवास वाढेल आणि या भागात वाढणारे हरिण काळवीट नीलगाय रानडुक्कर यांच्या प्रजननावर आपोआपच नियंत्रण येईल त्यामुळे शेतकऱ्यांचे नुकसान देखील होणार नाही.
वृक्ष लागवड करणे गरजेचे आहे सर्वांनी वेगवेगळ्या भागांमध्ये वृक्ष लागवड करण्यासाठी पुढाकार घ्यावा असे आव्हान आमदार प्रतापराव पाटील चिखलीकर यांनी यावेळी आढावा बैठकीत केले आहे. रिसनगाव परिसरातील वन विभागाच्या जमिनीवर दहा हजार विविध प्रकारचे झाडे लावण्याचा संकल्प माझ्याच पुढाकाराने घेण्यात आला होता त्यापैकी 5000 झाडे लावून त्या झाडाचे संगोपन करून वाढ करण्यात आलेली आहे यावेळी आमदार चिखलीकर यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले.