तभा फ्लॅश न्यूज/वाशी : अतिवृष्टी पावसाने धुमाकूळ माजवला आहे. या शेतकऱ्याचं मोठा नुकसान झाला आहे. तूर, उडीद, मका, केळी, कांदा, ऊस, सोयाबीन पिके पाण्याखाली गेली असल्याने पिके जागेवरती सडून जाऊ लागली आहेत. हातात आलेला घास डोळ्यासमोर वाया जात असल्याने शेतकरी हातबल झाला आहे. त्यात जिओ ट्रेकिंग चे फोटो अनिवार्य केल्याने शेतकरी संभ्रमात आहे. याबाबत प्रशासनाकडून दुसरा काही निर्णय घेण्यात येणार का? याची वाट शेतकरी बघत आहेत.
तालुक्यात सर्वत्र झालेल्या अतिवृष्टीमुळे काही गावांना जोडणारे फुल वाहून गेले आहेत. त्यामुळे गावांचा संपर्क तुटला असून जनजीवन विस्कळीत झाला आहे. पावसाचा जोर जास्त असल्याने बांधासह शेतातील माती वाहून गेली आहे. झालेल्या नुकसानीची पाहणी राज्याचे कृषिमंत्री दत्तात्रय भरणे, जिल्ह्याचे खासदार ओमप्रकाश राजे निंबाळकर यांनी पाहणी करून तात्काळ पंचनामे करण्याच्या सूचना प्रशासनाला दिल्या होत्या. शरदचंद्र पवार गटाला रामराम ठोकून अजित दादा गटात नुकताच प्रवेश केलेले माजी आमदार राहुल मोटे हे पायाला भिंगरी लावून नुकसानग्रस्त भागाची पाहणी करत असताना विद्यमान आमदार तानाजी सावंत कुठे आहेत? याची चर्चा विरोधकांकडून उपस्थित केली जात होती.
आमदार सावंत मतदारसंघात येऊन नुकसानग्रस्त भागाची पाहणी करून शेतकऱ्यांना मदत मिळवून द्यावी अशी शेतकरी वर्गामध्ये चर्चा सुरू होती. त्यात त्यांच्या कार्यकर्त्यांनी ही चर्चा सावंतापर्यंत पोहोचवली अनु मग काय? “राज्या बोले दल हले” आमदार तानाजी सावंत हे ॲक्शन मोडमध्ये आले आणि त्यांनी सर्व तहसीलदारांना पुण्यातून फोन करत प्रसासनला सूचना केल्या. विधानसभेत एकही मंडळ, गाव अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीच्या पंचनाम्यापासून वंचित राहू नये याची खबरदारी घेण्यात यावी अशा सूचना सावंत यांनी अधिकाऱ्यांना दिल्या. अनु मग सुरू झाली ती तिन्ही तालुक्यातील तहसीलदार, कृषी अधिकारी, कृषी सहाय्यक, मंडळ अधिकारी, तलाठ्यांच्या पळापळी पंचनामे. परंतु विधानसभेतील जनतेला आमदार सावंत कधी दर्शन देणार अशी चर्चा या निमित्ताने विरोधकांकडून उपस्थित केली जात आहे.