मुखेड / प्रतिनिधी :- रणजित जामखेडकर
तालुक्यातील अशोक विद्यालय एकलारा येथे गेल्या ३ दशकांपासून माध्यमिक सहशिक्षक गणित विज्ञानाचे विषयाचे विशेष शिक्षक म्हणून मोमीन शेख निसार महेबूब यांनी विद्यार्थ्यांना अध्यापनाचे धडे दिले.शेख सर यांचा प्रदिर्घ सेवेनंतर ते वयोमानानुसार सेवानिवृत्त झाले. सेवानिवृत्ती निमित्त संस्थेच्या वतीने निरोप समारंभ व गौरव सन्मान सत्योकार सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते.
या कार्यक्रमाचे अध्यक्ष संस्थेच्या मुख्याध्यापिका सौ. चिंतेवार मॅडम यांच्या सह शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांनी सेवानिवृत्ती निमित्त विशेष सत्कार करून कार्यक्रमाची सुरुवात केली उपस्थितांनी आपल्या मनोगतातून मोमीन सरांच्या शैक्षणिक व सामाजिक योगदानाची प्रशंसा केली व त्यांच्या सेवानिवृत्त जीवनासाठी शुभेच्छा दिल्या.
या कार्यक्रमास आजी – माजी विद्यार्थ्यांनी आपल्या गुरुवर्य शिक्षकांच्या आठवणींना उजाळा दिला कार्यक्रमाच्या शेवटी मोमीन शेख सरांनी सर्व सहकाऱ्यांसह विद्यालयातील सर्व कर्मचाऱ्यांचे अभार मानले. यावेळी अशोक विद्यालयाचे मुख्याध्यापीका सौ.कविता चिंतेवार मॅडम, म्यानेवार सर, वाघमारे सर, बिरादार सर, शेख सर,कागणे सर, पुरमवार सर ,वडजे मॅडम, तांबोळी सर, सोनकांबळे सर यांच्या सह कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.