कंधार प्रतिनिधी –
ग्रामीण भागातील पत्रकार सक्षम झाला पाहिजे पत्रकार हे आपल्या हक्कापासून वंचित राहू नये यासाठी पंचसूत्री घटकाचा कार्यक्रम घेऊन पत्रकारांना न्याय देण्यासाठी व्हाॅईस ऑफ मिडिया ही संघटना तत्पर असल्याचे प्रतिपादन संघटनेचे मराठवाडा अध्यक्ष विजय चोरडिया यांनी कंधार येथील पत्रकार संघाच्या बैठकीत केले.
शिर्डी येथे होणाऱ्या अधिवेशनासंबधी व्हाईस ऑफ मिडिया या संघटनेची बैठक कंधार येथील शासकीय विश्रामगृहावर दिनांक 4 ऑगस्ट रोजी आयोजित करण्यात आली होती. सदरील बैठकीस व्हाईस ऑफ मिडियाचे मराठवाडा अध्यक्ष विजय चोरडिया, नांदेड महानगर अध्यक्ष गणेश जोशी जिंतूर चे तालुकाध्यक्ष चव्हाण हे उपस्थित होते. यावेळी चोरडिया व जोशी यांचा कंधार तालुका संघटनेच्या वतीने शाल, श्रीफळ व पुष्पहार देऊन सत्कार करण्यात आला. या प्रसंगी पत्रकारांना मार्गदर्शन करताना मराठवाडा अध्यक्ष विजय चोरडिया म्हणाले की, जागतिक पातळीवर पत्रकारासाठी न्याय हक्कासाठी काम करणारी एकमेव संघटना म्हणून व्हाईस ऑफ मीडिया काम करते. पत्रकारासाठी कौशल्य शिक्षण, घरकुल, आरोग्य, निवृत्तीनंतर पेन्शन योजना आदी पत्रकाराच्या प्रश्नासाठी संघटना काम करत आहे.ग्रामीण भागातील पत्रकार सक्षम झाला पाहिजे,छोटे-मोठे उद्योग आदी पंचसूत्री कार्यक्रम घेऊन संघटनेची वाटचाल सुरू आहे. याच व्हाईस ऑफ मीडिया संघटनेच अधिवेशन 31 ऑगस्ट ल शिर्डी येथे होणार असून या अधिवेशनास कंधार तालुक्यातील संघटनेचे अधिका अधिक पदाधिकारी उपस्थित राहावे, असे आवाहन त्यांनी केले आहे.यावेळी गणेश जोशी यांनी ही पत्रकाराना मार्गदर्शन केले. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्रसंचालन संतोष कांबळे यांनी केले तर आभार विनोद तोरणे यांनी मानले.
यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून दयानंद कदम, संभाजी कांबळे उपस्थित होते तर व्हॉईस ऑफ मीडियाचे कंधार तालुका अध्यक्ष सय्यद हबीब ,सचिव विनोद तोरणे ,सहसचिव संतोष कांबळे ,कार्याध्यक्ष माधव गोटमवाड,सदस्य मगदुम परदेसी ,
ॲड. उमर शेख , प्रा जमील बेग , ॲड. सिद्धार्थ वाघमारे , माधव जाधव , आदींची उपस्थिती होती.