तभा फ्लॅश न्यूज/पंढरपूर : राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी तात्काळ आपले वक्तव्य मागे घेऊन वारकरी संप्रदायाची माफी मागितली पाहिजे अशी मागणी वारकरी संप्रदाय पाईक संघाचे राष्ट्रीय कार्यकारिणी सदस्य रामकृष्ण हनुमंत महाराज वीर यांनी केली आहे.
या संदर्भात वारकरी पाईक संघाच्या वतीने सुप्रिया सुळे यांच्या वक्तव्या बाबत भूमिका स्पष्ट करताना प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात नमूद केले आहे की, यद्यदाचरति श्रेष्ठस्तत्तदेवेतरो जनः । जेष्ठ लोक जसे आचरण करतात त्याचे अनुकरण समाज करत असतो. सुप्रियाताई देशातील जेष्ठ नेत्या आहेत, त्यांनी वक्तव्य करताना यांचा समाजावर काय परिणाम होईल याचे भान राखू नये याचे आश्चर्य वाटते व या बेताल वक्तव्याचा निषेधही करावा वाटतो.
मी खरं बोलते कारण आहे मी रामकृष्ण हरि वाली आहे! मी माळ घातली नाही कारण माझा मांसाहाराचा मोह गेला नाही पण,.माझ्या पांडुरंगाला ते चालतं ! याचा परिणाम म्हणून सगळे लोक पांडुरंगाला मांसाहार वर्ज्य नाही असा अर्थ काढू लागले तर… वारकरी संप्रदायाने आज वर लोकांना मद्य -मांस या विकृत आहारापासून दूर ठेवून विवेकपुर्ण व आचारसंपन्न बनवण्याचा जो शेकडो वर्षे प्रयत्न केला आहे त्याची सरळ सरळ थट्टा आहे.
या बरोबरच छत्रपती शिवरायांनाही जगद्गुरु तुकोबारायांनी ‘कंठी मिरवा कृष्ण तुळशी।व्रत करा एकादशी।।’ असा उपदेश केला होता. हे रात्रंदिवस शिवाजी महाराज यांच्या नावाचा जयजयकार करणार्यांना लक्षात कसे येत नाही असा देखील सवाल उपस्थित करून सुप्रियाताईंनी तात्काळ आपले वक्तव्य मागे घेऊन वारकरी संप्रदायाची माफी मागितली पाहिजे अशी मागणी वारकरी संप्रदाय पाईक संघाचे राष्ट्रीय कार्यकारिणी सदस्य रामकृष्ण हनुमंत महाराज वीर यांनी केली आहे.
Post Views: 17