सोलापूर – श्री मार्कंडेय सोलापूर सहकारी रूग्णालय कर्मचारी नागरी पतसंस्था मर्यादित सोलापूर या संस्थेच्या चेअरमनपदी राजू पुंजाल, तर उपाध्यक्षपदी निशांत संगा यांची तर मानद सचिव म्हणून श्रीनिवास बुर्ला यांची एकमताने निवड करण्यात आली.
उपनिबंधक कार्यालयात अधिकारी आर एन ढोणे यांच्या अध्यक्षतेखाली प्रक्रिया पूर्ण करण्यात आली. श्री मार्कंडेय सोलापूर सहकारी रूग्णालय कर्मचारी नागरी पतसंस्था मर्यादित सोलापूर या संस्थेची पंचवार्षिक निवडणूक नुकतीच पार पडली होती ही निवडणूक बिनविरोध झाली.
यावेळी संचालक म्हणून राजू पुंजाल, राजीव येदूर, प्रभाकर सग्गम, निशांत संगा, राघवेंद्र ऊर्फ राकेश पुंजाल, दिगंबर इप्पलपल्ली, गीता मादगुंडी, सविता शंकूर, विकास कांबळे, उज्ज्वला लिंबोळे, चंद्रकांत कोनापुरे हे निवडून आले होते. आज झालेल्या अध्यक्ष व पदाधिकारी निवडीची प्रक्रिया उपनिबंधक कार्यालयातील अधिकारी ढोणे यांच्या अध्यक्षतेखाली झाली निवडीनंतर अध्यक्ष राजू पुंजाल व्हा चेअरमन निशांत संगा मानद सचिव श्रीनिवास बुर्ला यांचा सत्कार करण्यात आला.
या निवडीनंतर रूग्णालयाचे प्रेसिडेंट सत्यनारायण बोल्ली, चेअरमन डॉ माणिक गुर्रम व्हाइस चेअरमन रमेश विडप आदी संचालकांनी नुतन पदाधिकाऱ्यांचा सत्कार केला.

























